कोलकाता : आता २०१९ साल संपायला अवघे काही दिवस उरलेत. हे वर्ष संपण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या (West Bengal) सुंदरबनातून (Sundarban) एक चांगली बातमी मिळतेय. सुंदरबनात यंदाच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदाच रॉयल बंगाल टायगर (Royal Bengal Tiger) पाहायला मिळालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरबनच्या देबाकी जंगलात मंगळवारी (१९ नोव्हेंबर) रॉयल बंगाल टायगर रेंगाळताना दिसला. नावाप्रमाणेच या वाघाची चालही 'रॉयल' होती.
उल्लेखनीय म्हणजे, मंगळवारपासूनच सुंदरबनात पर्यटकांना जाण्याची परवानगी देण्यात आलीय. बुलबुल वादळाच्या पार्श्वभूमीवर सुंदरबन भागात पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली होती.
त्यामुळे, इथे जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर इथं दाखल झालेल्या पर्यटकांना रॉयल बंगाल टायगर पाहण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे ते चांगलेच खुश झाले.