कोरोना लसीच्या उत्पादनात 'या' समुदायासाठी कोटा?

समुदायातील सर्वजण... 

Updated: Jul 27, 2020, 11:30 AM IST
कोरोना लसीच्या उत्पादनात 'या' समुदायासाठी कोटा?  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : देशभरात coronavirus कोरोना व्हायरसच्या लसीच्या संशोधनाच्या कामाला बराच वेग आला आहे. यामध्ये सीरम या संस्थेचं नाव बरंच चर्चेतही आहे.  यातच आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना उद्देशून स्वदेश फाऊंडेशनचे संस्थापक  रोनी स्क्रूवाला यांनी एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी असा काही प्रश्न विचारला की, त्यांची ही प्रश्नोत्तरं नेटकऱ्यांसाठीही चर्चेचा विषय ठरली. 

'कोरोनापासून वाचण्यासाठी पारशी समुदायासाठी तुम्ही काही खास राखीव लसी ठेवताय...', काहीशा विनोदी अंदाजात त्यांनी केलेल्या या ट्विटला अदार यांनीही त्याच शैलीत उत्तर दिलं. 

'हो तर... आपल्या समुदायासाठी आपण पुरेसा साठा ठेवणार आहोत. आपल्या समुदायाची संख्या पाहता एका दिवसाच इतक्या लसीचं उत्पादन करु की साऱ्या जगातील पारशी समुदायातील लोकांना कोरोनापासूनचं संरक्षण मिळेल.', असं अदार यांनी ट्विटमध्ये लिहिलं. मुळच्या पारशी समुदायातील असणाऱ्या या दोन्ही प्रतिष्ठितांचा हा ट्विटरवरील संवाद काहीसा विनोदी अंगानं असला तरीही तो तितकाच आशावादीही ठरला असं म्हणायला हरकत नाही. 

लसीच्या पुढील टप्प्यातील चाचणीसाठी मागीतली परवानगी......

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया नं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाद्वारा तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या चाचणीसाठीच्या पुढील टप्प्याकरता ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे परवानगी मागितली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार याबाबतचं विचारणा पत्रही डीसीजीआयकडे पाठवण्यात आलं आहे. 

वर्षभरात 'या' सख्येनं होणार लसीचं उत्पादन... 

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) च्या सीईओपदी असणाऱ्या अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांच्या म्हणण्यानुसार ते एस्ट्राजेनेकासह हातमिळवणी करत पुढील वर्षभरात कोरोनाविरोधातील या लसीचं उत्पादन थेट शंभर कोटींच्या घरात करणार आहेत. भारत आणि मध्यम मिळकतीच्या राष्ट्रांसाठी ही लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आतापर्यंत मिळालेलं यश पाहता या वर्षाच्या अखेरील ही लस पूर्ण स्वरुपात विकसीत होऊन पुढील वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांच्या आतच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता पूनावाला यांनी वर्तवली आहे.