हा अपघात थरकाप उडवणारा... 3 गाड्यांचे तुकडे-तुकडे, व्हिडीओ व्हायरल

तुम्ही सोशल मीडियावर अपघाताशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडीओ पाहिले असतील, जे खूपच धक्कादायक असतात.

Updated: Aug 2, 2022, 08:33 PM IST
हा अपघात थरकाप उडवणारा... 3 गाड्यांचे तुकडे-तुकडे, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : रस्त्यावरून चालताना किंवा गाडी चालवताना खूप काळजी घेण्याची गरज आहे. कारण तुम्ही गाडीत असा किंवा रस्त्यावर हे दोन्हीही तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतं. कारण अपघात कधी आणि कसा होऊ शकतो हे कोणालाच कळत नाही. बऱ्याचदा काही लोकांची चुकी नसताना देखील ते अपघाताला बळी पडतात. त्यामुळे रस्त्यावर दक्षता घेणं केव्हा ही चांगलं.

तुम्ही सोशल मीडियावर अपघाताशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडीओ पाहिले असतील, जे खूपच आश्चर्यकारक आहेत. आजकाल असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहाणार नाही, कारण हा अपघात खूपच भयानक आहे.

या अपघातात एक-दोन नव्हे तर तीन-तीन वाहनांचा चक्काचूर झाला. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक कार रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना वेगवान ट्रकने तिला थेट धडक दिली. यादरम्यान समोरून येणारा ट्रक त्या वाहनांना धडकतो, त्यामुळे एका झटक्यात ट्रकच्या चिंध्या उडून जातात आणि या सगळ्यात त्या कारचा दोन ट्रकच्यामध्ये चुरा होतो.

आता या भीषण अपघातात किती लोक जखमी झाले किंवा किती जणांचे प्राण हेले हे काही कळलेलं नाही. पण हा अपघात एवढा भयंकर होता की यात लोक गंभीर जखमी होण्यासोबतच त्यांचा मृत्यूही होण्याची शक्यता होती.

हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर डॅश कॅम ट्वाट्स नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 31 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी व्हिडीओला लाईकही केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.