रांची : देवघर चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. यानंतर आता आरजेडीने सीबीआय आणि भाजपवर टीका केली आहे.
कोर्टाच्या निकालानंतर आरजेडीचे प्रवक्ता मनोज झा यांनी पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या इशाऱ्यावर सीबीआय काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आरजेडीने म्हटलं की, अवैध मंजुरीवर ज्यांनी एफआयआर दाखल केली त्यांनाच तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. यामगे भाजपचं कारस्थान आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. हा देश फक्त २ व्यक्ती चालवत आहेत.
चारा घोटाळ्यामध्ये लालूंना दोषी ठरवल्यानंतर आता ३ जानेवारीला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. लालू यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांनी तुरुंगात पाठवण्यात येणार आहे.
#WATCH: Lalu Prasad Yadav outside Ranchi's Special CBI Court after being convicted in a #FodderScam case pic.twitter.com/hn6REkaizv
— ANI (@ANI) December 23, 2017