नवी दिल्ली : ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याचं ठरवलं आहे.
२०० रुपयांची नवी नोट उद्या म्हणजेच शुक्रवारपासून चलनात येणार आहे. यासंदर्भात आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृतरित्या जाहीर केलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या की, २०० रुपयांची नवी नोट चलनात येणार. मात्र, आता २०० रुपयांची ही नवी नोट चलनात उद्यापासून येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ही नवी नोट कशी असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. पण सर्वांची उत्सुकता आता संपलेली आहे कारण २०० रुपयांच्या नव्या नोटचा फोटो समोर आला आहे. पाहा कशी आहे ही २०० रुपयांची नोट...
#FLASH Reserve Bank of India to issue notes in denomination of Rs.200 tomorrow. pic.twitter.com/uRonGu2xkS
— ANI (@ANI) August 24, 2017
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. आाता २०० रुपयांची नोट शुक्रवारपासून चलनात येत आहे. २०० रुपयांची नवी नोट चलनात आल्यास रोखीने होणा-या व्यवहार सुलभ होण्यास मदत होणार आहे.