नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीत सतत वाढ होत होती. बुधवारी या दरांत कोणतीही वाढ पाहायला मिळाली नाही. तर दुसरीकडे डिझेलच्या किंमत तिसऱ्या दिवशी स्थिर आहेत. इंडियन ऑईलनुसार, मुंबईत आज पेट्रोलचा दर ८०.४२ रुपये, दिल्ली ७४.७६ रुपये, कोलकाता ७७.४४ रुपये तर चेन्नईत ७७. ७२ रुपये इतका आहे.
मुंबईत डिझेलचा दर ६८.९४ रुपये, दिल्ली ६५.७३, कोलकाता ६८.१४ आणि चेन्नईत ६९.४७ रुपये प्रति लीटर इतका आहे.
एनर्जी आणि रिसर्च अनुज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कच्च्या तेलाच्या साठ्यात वाढ झाल्याच्या वृत्तामुळे कच्च्या तेलाचे दर मंदावले आहेत. अमेरिका आणि चीनमधील व्यापाराचे प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नांमुळे तेलाच्या किंमतींना पाठिंबा मिळत असल्याचंही ते म्हणाले.
ऑइल मार्केटिंग कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करतात. कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या दरात पेट्रोलच्या किंमतीसह एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन जोडल्यानंतर याची किंमत जवळपास दुप्पट होते.
आपापल्या शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती घरबसल्याही जाणून घेता येऊ शकतात. केवळ एका एसएमएसवर (SMS) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची माहिती मिळू शकते. सकाळी ६ वाजल्यानंतर ९२२४९ ९२२४९ या क्रमांकावर SMS पाठवून किंमतींची माहिती मिळू शकते.