अॅमेझॉन, फ्लिटकार्टसाठी सर्वात मोठा धोका बनली ही कंपनी

  ई-कॉमर्समध्ये नावाजलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला पुढील वर्षी रिलायन्स रिटेलचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. आयटी उद्योगातील दिग्गज आणि इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी टी. व्ही. मोहनदास पई यांच्यानुसार आपल्या व्यापक रिच आणि दूरसंचार जाळे असलेल्या जिओचा वाढता व्याप पाहता रिलायन्स रिटेलला फायदा होणार आहे. 

Updated: Oct 16, 2017, 07:25 PM IST
 अॅमेझॉन, फ्लिटकार्टसाठी सर्वात मोठा धोका बनली ही कंपनी  title=

हैदराबाद :  ई-कॉमर्समध्ये नावाजलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला पुढील वर्षी रिलायन्स रिटेलचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. आयटी उद्योगातील दिग्गज आणि इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी टी. व्ही. मोहनदास पई यांच्यानुसार आपल्या व्यापक रिच आणि दूरसंचार जाळे असलेल्या जिओचा वाढता व्याप पाहता रिलायन्स रिटेलला फायदा होणार आहे. 

पेई म्हटले की पुढील वर्षी ई-कॉमर्स क्षेत्रात एकीकरणाचा मोठा खेळ होणार आहे. छोड्या कंपन्या या व्यापारातून हद्दपार होतील आणि प्रतिस्पर्धीच्या जमान्यात खेळाडूंची संख्या कमी होणार आहे. 

ई-कॉमर्स क्षेत्रात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला रिलायन्स रिटेलकडून कडवे आव्हान मिळणार आहे. पुढील वर्षात फक्त तीन मोठे प्लेअर बाजारात असलीत त्यात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट शिवाय रिलायन्स रिटेल पण येणार आहे.