मुंबई : फूड डिलीवरी सर्विस देणारी कंपनी Zomato सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. तामिळनाडूच्या एका व्यक्तीला Zomato एक्झिक्यूटिवने हिंदी शिकायला सांगण चांगलच महागात पडलं आहे. हे प्रकरण Zomato ला इतकं महागात पडलंय की, त्यांना चक्क माफी मागावी लागली आहे. त्या व्यक्तीचा असा दावा आहे की, त्याला हिंदी येत नसल्यामुळे Zomato ने रिफंड दिलं नाही.
तामिळनाडूच्या विकास नावाच्या व्यक्तीने झोमॅटोवर ऑर्डर केली. ऑर्डरमध्ये एक व्यक्ती गायब होती. यानंतर त्यांनी झोमॅटो ऍपवर कस्टर केअरसोबत चॅटिंग सुरू केली. विकासचं म्हणणं आहे की, त्याने जो पदार्थ नव्हता त्याचं रिफंड मागितलं. तर झोमॅटो एक्झिक्यूटीवच म्हणणं आहे की, त्याची भाषा हॉटेलमधील व्यक्तींना कळली नाही. यावर विकासचं म्हणणं होतं की, याची चिंता त्याने का करावी? जर झोमॅटो तामिळनाडूत उपलब्ध आहे. तर त्यांनी तिकडी भाषा समजणाऱ्या व्यक्तींनाच ठेवावे. त्यावर झोमॅटो एक्झिक्यूटीवचं म्हणणं होतं की,'हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. ती अतिशय कॉमन भाषा आहे. थोडी तरी यायलाच हवी.'
Ordered food in zomato and an item was missed. Customer care says amount can't be refunded as I didn't know Hindi. Also takes lesson that being an Indian I should know Hindi. Tagged me a liar as he didn't know Tamil. @zomato not the way you talk to a customer. @zomatocare pic.twitter.com/gJ04DNKM7w
— Vikash (@Vikash67456607) October 18, 2021
विकासने त्याच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केले. यानंतर #Reject_Zomato ने ट्विटर वर ट्रेंड करणे सुरु केले. झोमॅटो एक्झिक्युटिव्हनेही त्याला लबाड म्हटले असे ग्राहक म्हणतो. यानंतर अनेकांनी झोमॅटोवर टीका करण्यास सुरुवात केली आणि सोशल मीडियावर कंपनीविरोधात मोहीम सुरू झाली.
झोमॅटोने आपल्या एक्झिक्यूटीवच्या वर्तनामुळे माफी मागितली आहे. ट्विटरवर असलेल्या झोमॅटोच्या माफीनाम्यात लिहिलंय की,'आम्ही आपल्या कस्टमर केअर एजंटच्या व्यवहारामुळे माफी मागतो. आम्ही त्या कर्मचाऱ्याला टर्मिनेट केलंय. हे टर्मिनेशन आपल्या प्रोटोकॉल नुसार आहे. एजंटचा संपूर्ण व्यवहार हा संवेदनशीलतेच्या विरोधात होते. या अगोदर कस्टमर केअर एजंटला भाषा आणि विविधतेबाबत ट्रेनिंग दिलं जातं.'
Vanakkam Vikash, we apologise for our customer care agent's behaviour. Here's our official statement on this incident. We hope you give us a chance to serve you better next time.
Pls don't #Reject_Zomato https://t.co/P350GN7zUl pic.twitter.com/4Pv3Uvv32u
— zomato (@zomato) October 19, 2021
झोमॅटोने पुढे म्हटले आहे की, 'आम्ही झोमॅटो ऍपची तमिळ आवृत्तीही बनवत आहोत. आम्ही यापूर्वीच तामिळसाठी स्थानिकीकरण केले आहे आणि आम्ही कोयंबटूरमध्ये स्थानिक तमिळ कॉल/सपोर्ट सेंटर देखील सुरू करत आहोत. आम्हाला समजते की अन्न आणि भाषा कोणत्याही स्थानिक संस्कृतीचा मुख्य भाग आहे आणि आम्ही दोघांनाही खूप गांभीर्याने घेतो. झोमॅटोने इंग्रजी आणि तामिळ दोन्ही भाषांमध्ये माफी मागितली आहे.