'बंडखोर आणि डरपोक लोकांनी RSSचा रस्ता धरा'; राहुल गांधींचा स्वपक्षीयांना इशारा

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या पक्षातील नेत्यांना निर्भिड होण्याचे धडे देत आहेत. सोशल मीडिया सेलच्या कार्यकरर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी गांभीर्याने पार्टीच्या नेत्यांना मोठा संदेश दिला आहे. 

Updated: Jul 17, 2021, 12:41 PM IST
'बंडखोर आणि डरपोक लोकांनी RSSचा रस्ता धरा'; राहुल गांधींचा स्वपक्षीयांना इशारा title=

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या पक्षातील नेत्यांना निर्भिड होण्याचे धडे देत आहेत. सोशल मीडिया सेलच्या कार्यकरर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी गांभीर्याने पार्टीच्या नेत्यांना मोठा संदेश दिला आहे. 

कॉंग्रेसला हवे निर्भिड लोक
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, जे लोक निर्भिड आहेत परंतु कॉंग्रेसच्या बाहेर आहेत. ते सर्व आपले आहेत. त्यांना पक्षात आणा. आणि जे पक्षात आहेत परंतु डरपोक आहेत. त्यांना पक्षातून बाहेर काढा. चला निघा आरएसएसमध्ये निघा. आम्हाला निर्भिड लोक हवेत.

राहुल गांधींच्या वक्तव्याचे अर्थ
राहुल गांधी म्हणतात की, कॉंग्रेसच्या बाहेर अनेक लोक आहेत जे निर्भिड आहेत. ते आपले आहेत, त्यांना पक्षात आणा. म्हणजेच राहुल गांधी ममता बॅनर्जी, शरद पवार, अरविंद केजरीवाल, आणि अखिलेश यादव यांच्यासारख्या विरोधी पक्षांच्या मोठ्या चेहऱ्यांना कॉंग्रेसच्या नेतृत्वात एकत्रा आणण्याचा संदेश देत आहेत का? 

कॉंग्रेसला निर्भिड नेते कसे मिळणार
राहुल गांधी यांनी आणखी म्हटले की, जे आपल्या पक्षात आहेत आणि डरपोक आहेत त्यांना बाहेर काढा. म्हणजेच हा संदेश कॉंग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांना तर नव्हता? जे कॉंग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुकीची मागणी करीत आहेत. 
किंवा कॉंग्रेसमध्ये राहायचे असेल तर भाजप आणि मोदी सरकारच्याविरोधात बोलणं म्हणजेच निर्भिड असणे असे मानायचे का?

आणखी महत्वाचा मु्द्दा म्हणजे जे आरएसएसचे आहेत त्यांनी निघून जावं. कॉंग्रेसला त्यांची गरज नाही. म्हणजेच हा मुद्दा ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितिन प्रसाद सारखा विचार करीत असलेल्या नेत्यांना इशारा होता. 

राहुल गांधीच्या या वक्तव्यांवर भाजपने टीका केली आहे. राहुल गांधी आपले अपयश झाकण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करीत आहेत. त्यांना संघाबद्दल अगदी मर्यादीत माहिती आहे.

राहुल गांधी उघडपणे तर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नावं घेऊ शकत नाही. परंतु गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनीष तिवारीसारख्या 23 नेत्यांना कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक बदल हवे आहेत.