२०० रुपयांची नोट चलानात का? ही आहेत कारणं

५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याचं ठरवलं आहे.

Updated: Aug 24, 2017, 08:24 PM IST
२०० रुपयांची नोट चलानात का? ही आहेत कारणं title=

नवी दिल्ली : ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याचं ठरवलं आहे.

२०० रुपयांची नवी नोट उद्या म्हणजेच शुक्रवारपासून चलनात येणार आहे. पण २०० रुपयांची ही नोट चलनात आणण्याचं नेमकं कारण काय आहे याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

२०० रुपयांची नोट चलनात आणण्याची कारणं

- मिसिंग लिंकला पूर्ण करण्यासाठी २०० रुपयांची नोट चलनात आणली असल्याचं बोललं जात आहे. सध्या १, २, ५, १०, २०, ५०, १००, ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटा चलनात आहे. यामध्ये २०० रुपयांची नोट नाही.

- १ आणि ५ रुपयांच्या नोटेमध्ये २ रुपये आहेत, १० आणि ५० रुपयांच्या नोटेमध्ये २० रुपयांची नोट आहे पण १०० आणि ५०० रुपयांच्या नोटेमध्ये २०० रुपयाची नोट नसल्यामुळे हा निर्णय घेतला गेला असल्याची शक्यता आहे.

- २०० रुपयांचा नोटेमुळे सामान्य माणसाला व्यवहार करणं सोपं जाईल

- यामुळे नकली नोटा चलनात यायचं प्रमाणही कमी होईल

- २०० रुपयाची नोट चलनात आल्यामुळे चलनातल्या छोट्या आणि फाटलेल्या नोटा बदलण्यात मदत होईल.

- २०० रुपयांच्या नोटा चलनात आल्यामुळे महागाई नियंत्रणात यायलाही मदत होईल