2000 च्या नोटेवर आरबीआयचा मोठा निर्णय

तुमचं टेंशन वाढवू शकणारा मोठा निर्णय आरबीआयने 2000 च्या नोटेच्या बाबतीत घेतलाय.

Updated: Nov 27, 2017, 04:10 PM IST
2000 च्या नोटेवर आरबीआयचा मोठा निर्णय title=

नवी दिल्ली : तुमचं टेंशन वाढवू शकणारा मोठा निर्णय आरबीआयने 2000 च्या नोटेच्या बाबतीत घेतलाय.

आरबीआयच्या निर्णयामागचं कारण

2000 रुपयांच्या नोटांचा तुटवडा आणि छोट्या चलनाच्या नोटांचा एटीएमला कमी वापर, यामुळेच आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. यामुळे काळ्या पैसा नियंत्रणात येईल आणि त्याचबरोबर छोट्या चलनातील नोटांचा वापरसुद्धा वाढेल.  

2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद

आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. चालू आर्थिक वर्षात त्यांची छपाई करण्यात येणार नाही. याविषयावर सरकारने वेळोवेळी विधानं केली आहेत. राज्यसभेतसुद्धा यावर चर्चा झाली आहे.

आरटीआयमुळे उघड झालं सत्य

2000 रुपयांच्या नोटांच्या बाबतीतली गोंधळाची परीस्थिती स्पष्ट होण्यास माहितीच्या अधिकारांचा उपयोग झाला आहे. नोटांची छपाई करणाऱ्या सेक्युरिटी प्रिंटींग अॅंड मिटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडीया लिमिटेटला माहितीच्या अधिकारात हा प्रश्न विचारण्यात आलाय. त्यात हे स्पष्ट झालं आहे की 2000 रुपयांच्या नोटांची मागणी आरबीआयने केलेली नाही. फक्त छोट्या चलनातील नोटांची मागणी आरबीआयकडून करण्यात आलेली आहे.

बॅँक काउंटरवर मिळणार छोट्या चलनातील नोटा

आरबीआयने सर्व बॅँकांना सूचना केली आहे की 2000 आणि 500 च्या नोटा फक्त एटीएममध्ये टाकण्यात याव्यात. बॅँक काउंटरवर छोट्या चलनातील नोटा देण्यात याव्यात. कारण 2000 आणि 500 नोटांची छपाई बंद आहे.