महागाई दर घटल्यानं आरबीआय व्याजदर कमी करणार?

देशातल्या किरकोळ महागाई दरानं नवा नीचांक गाठल्यामुळे रिझर्व्ह बँकेवर व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढतो आहे. महागाई कमी झालीय आणि त्यासोबत विकासदरही घटल्यानं पुढच्या महिन्यात उर्जित पटेल आणि मॉनेटरी पॉलिसी कमिटी व्याजदरांविषयी काय भूमिका घेते याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Updated: Jul 13, 2017, 06:32 PM IST
महागाई दर घटल्यानं आरबीआय व्याजदर कमी करणार? title=

मुंबई : देशातल्या किरकोळ महागाई दरानं नवा नीचांक गाठल्यामुळे रिझर्व्ह बँकेवर व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढतो आहे. महागाई कमी झालीय आणि त्यासोबत विकासदरही घटल्यानं पुढच्या महिन्यात उर्जित पटेल आणि मॉनेटरी पॉलिसी कमिटी व्याजदरांविषयी काय भूमिका घेते याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

किरकोळ महागाईचा दर जून महिन्यात १.५४ टक्के आहे. अठरा वर्षात सर्वात खालचा स्तरावर जाऊन हा दर थांबला. जून महिन्यात अन्नधान्याच्या महागाईचा दर घसरल्यानं एकूण महागाई कमी झालीय. पण महागाई कमी होत असताना औद्योगिक उत्पादनाचा दरही दिवसेंदिवस घसरतोय. मे महिन्यातल्या औद्योगिक उत्पादन अवघ्या १.७ टक्के दरानं वाढलं. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा दर दोन टक्के कमी आहे.