RBI Imposes Penalty: HDFC नंतर, आरबीआयने या मोठ्या बँकेला ठोठावला 2.25 कोटींचा दंड, या बँकेत तुमचे खाते आहे का?

RBI Imposes Penalty : पुन्हा एका आरबीआयने (RBI)आणखी एका बँकेला मोठा दणका दिला आहे. आरबीएल (RBL Bank Ltd.) बँकेला कर्ज वसुली प्रकरणाबाबत  2.27 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Updated: Mar 21, 2023, 09:09 AM IST
RBI Imposes Penalty: HDFC नंतर, आरबीआयने या मोठ्या बँकेला ठोठावला 2.25 कोटींचा दंड, या बँकेत तुमचे खाते आहे का? title=

RBI Imposes Penalty: आरबीआयने (RBI) बँक नियमांचे पालन न केल्याबद्दल HDFC लिमिटेड नंतर आणखी एका बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. आरबीएल (RBL Bank Ltd.) बँकेला कर्ज वसुली प्रकरणाबाबत  2.27 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे बँकेला चांगलाच बोजा पडला आहे. आधीच कर्ज प्रकरणात वसुली झालेली नाही आणि त्यात हा दंड. त्यामुळे बँक अचडणीत सापडली आहे.

 या कारणामुळे आरबीआयने ठोठावला दंड  

भारतीय रिझर्व्ह बँकेने ( RBI) आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, दंड अंतर्गत लोकपाल योजना, 2018, बँकांसाठी योग्य व्यवहार संहिता, बँकांचे क्रेडिट कार्ड ऑपरेशन्स, वित्तीय सेवा आणि रिकव्हरी एजंट्सचे जोखीम व्यवस्थापन आणि आउटसोर्सिंग यांच्याशी संबंधित आहे. आरबीआयने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच काही तरतुदींचे पालन न करणे, यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तथापि, आरबीआयने म्हटलेय, आर्थिक वर्ष 2018-19 ते 2021-22 या कालावधीतील नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी हा दंड आहे.

सहकारी बँकांकडून विविध नियमांचे उल्लंघन

बँकेने आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेशी त्याचा काहीही संबंध नाही. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने याआधी अनेक सहकारी बँकांना विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंडही ठोठावला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या सहकारी बँकांमध्ये सोलापूर (महाराष्ट्र) येथील लोकमंगल सहकारी बँक लि., जालंधर (पंजाब) येथील इम्पीरियल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. यांचा यात समावेश आहे.

याशिवाय रायसेन (मध्य प्रदेश) येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मरियडित, मंदसौर (मध्य प्रदेश) येथील स्मृती नागरी सहकारी बँक, मुंबईमधील रायगड सहकारी बँक, नोबल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नोएडा (उत्तर प्रदेश) यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. नियमांच्या पूर्ततेच्या पातळीवर या बॅंकांवर चुका झाल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने 180 हून अधिक बँकांवर कडक कारवाई केली आहे. अनेक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या बँकांना दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या बँकांवर 12 कोटींहून अधिक रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  

किती बँकांना दंड ठोठावला?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 22 सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे.  2021 पर्यंत हा आकडा 124 बँकांपर्यंत पोहोचला होता. त्याचवेळी डिसेंबर महिन्यात आरबीआयने आणखी 33 बँकांवर आणखी दंड ठोठावला. रिझर्व्ह बँकेने 19 डिसेंबरला 20 बँकांवर तर 12 डिसेंबरला 13 सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे.