नवी दिल्ली : आरबीआयचे पतधोरण आज जाहीर होणार आहे. सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. व्याजदर जैसे थेच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. गेल्याच आठवड्यात सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतरचे हे पहिले द्विमासिक पतधोरण आहे.
देशातील वाढती महागाई पाहता व्याजदरात कपातीची शक्यता कमी असल्याचं बोललं जातंय. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय पतधोरण समितीची बैठक सुरू झालीय.
या बैठकीतील निर्णय आज जाहीर होणार आहे. रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच्या दोन्ही द्विमासिक पतधोरणात कोणतेही बदल केलेले नाही.