रुपयाच्या घसरणीला ब्रेक लावला तरी कुणी? जाणून घ्या RBI आणि IMF मधील नेमका वाद

RBI Latest News : रिझर्व्ह बँकेने आयएमएफचा दावा फेटाळला चलनाच्या बाजारात रिझर्व्ह बँकेचा सक्रीय हस्तक्षेप, आयएमएफचा दावा रिझर्व्ह बँकेने फेटाळला.   

निनाद झारे | Updated: Dec 20, 2023, 09:06 AM IST
रुपयाच्या घसरणीला ब्रेक लावला तरी कुणी? जाणून घ्या RBI आणि IMF मधील नेमका वाद  title=
RBI against IMF clashes over rupee value latest news

निनाद झारे, झी मीडिया, मुंबई: (RBI Latest News ) भारतीय रिझर्व्ह बँक रुपयाची किंमत इतर चलनांच्या तुलनेत घसरु नये यासाठी वारंवार बाजारप्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचं गंभीर निरीक्षण आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं नोंदवलं. रिझर्व्ह बँकेने मात्र या निरिक्षणात कोणतेही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलंय. डिसेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 याकाळात डॉलर आणि रुपयाची किंमत एका विशिष्ट मर्यादेत चढ उतार नोंदवण्यात आले. याच काळात जागतिक चलन बाजारात डॉलरच्या किंमतीत इतर चलनाशी तुलना करता मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. 

भारतीय रुपया मात्र इतर चलानांप्रमाणे घसरला नाही. नेमका हाच मुद्दा आयएमएफला खटकल्याचं निरीक्षणात नमूद करण्यात आला. बाजारातील चढ-उताराचे व्यवस्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने निश्चित मर्यादेपेक्षा अधिक हस्तक्षेप केल्याचा दावा नाणे निधीने केला. थोडक्यात रुपयाच्या घसरणीला अर्थाल मोगरीला आरबीआयनं ब्रेक लावल्याचं म्हटलं जात आहे. रिझर्व्ह बँकेने मात्र दावा स्पष्ट पणे फेटाळला आहे. डॉलर आणि रुपयाचा विनमय दर हा बाजार आधारितच ठरवला जातो. त्यात रिझर्व्ह बँक कोणताही हस्तक्षेप करत नाही असं बँकेने स्पष्ट केलंय. 

हेसुद्धा वाचा : मोठी बातमी! EMI वाढणार की कमी होणार? RBI नं केलं स्पष्ट

 

रिझर्व्ह बँक रुपयाची कोणतीही निश्चित किंमतीचे कोणतेही लक्ष्य (टार्गेट) ठेवत नाही आणि त्यामुळेच ते टार्गेट साधण्यासाठी पावलेही उचलत नाही असंही म्हटलंय. चलन बाजारात कमी कालावधीत वेगवान चढ उतार होत असतील, तर ही वधघटस्थिर करण्यापुरतंच रिझर्व्ह बँक चलन बाजारात हस्तक्षेप करते.