Ration Card | लवकरच रेशन लाभार्थ्यांच्या पात्रतेत बदल; जाणून घ्या नवीन नियम

 केंद्रिय अन्न आणि वितरण मंत्रालयातर्फे (Department of Food & Public Distribution) मोठा निर्णय घेण्यात आला आहे

Updated: Sep 5, 2021, 11:47 AM IST
Ration Card | लवकरच रेशन लाभार्थ्यांच्या पात्रतेत बदल; जाणून घ्या नवीन नियम title=

 नवी दिल्ली : केंद्रिय अन्न आणि वितरण मंत्रालयातर्फे (Department of Food & Public Distribution) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या सर्व सरकारी रेशन लाभार्थ्यांच्या मानांकनामध्ये आता बदल करण्यात येणार आहे.  मानकांचे प्रारुप आता बदलण्यात येणार आहे. या संबंधी राज्य सरकारांसोबत अनेक बैठका झाल्या आहेत.
 
 संपन्न लोक देखील घेत आहेत लाभ
 अन्न आणि वितरण विभागाच्या नियमांनुसार सध्या देशात 80 कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे लाभार्थी आहेत.  यामध्ये अनेक असे लोक आहेत. जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्रालय बदल करण्याच्या तयारीत आहे.
 
 मंत्रालयाचे सचिव सुधांशू पांडे यांनी म्हटले की,  मानकांच्या बदलासंबधी मागील सहा महिन्यांपासून राज्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांवर मंत्रालय काम करीत आहे. या महिन्यात ही मानकं निश्चित करण्यात येतील. नवीन मानके लागू झाल्यानंतर केवळ पात्र लोकांनाचा रेशनचा तसेच अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेता येईल.
 
 वन नेशन वन रेशन कार्ड
 वन नेशन वन रेशन कार्ड योजना डिसेंबर 2020 पासून 32 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात लागू करण्यात आली आहे. साधारण 86 टक्के जनसंख्या या योजनेचा लाभ घेत आहे.