कारागृहात राम रहीमचं वजन घटलं

अनुयायी साध्वींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 7, 2017, 04:55 PM IST
कारागृहात राम रहीमचं वजन घटलं title=
File Photo

नवी दिल्ली : अनुयायी साध्वींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गेल्या ४० दिवसांपासून राम रहीम कारागृहात शिक्षा भोगत आहे. सुरुवातीला राम रहीमला कारागृहातील दाल-रोटी आवडत नव्हती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्याकाही दिवसांपूर्वी राजेशाही थाटात राहणाऱ्या राम रहीमला आता कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेली कामं करत आहे. कारागृहात राम रहीमला नियमांनुसार काम करावं लागत आहे.

कारागृहातील सुत्रांच्या मते, ४० दिवसांच्या दरम्यान बाबा राम रहीमचं वजन ६ किलोने घटलं आहे. २८ ऑगस्ट रोजी राम रहीमला कारागृहात दाखल करण्यात आलं. त्यावेळी राम रहीमचं वजन ९० किलो होतं. मात्र, आता त्याचं वजन घटून ८४ किलो झालं आहे.

कारागृहात गेल्यानंतर सुरुवातीच्या काळात राम रहीमने अनेक दिवस दाल-रोटी खाण्यास नकार दिला. त्याने हनीप्रीत आणि परिवारातील इतर सदस्यांना भेटण्याची विनंती केली होती. त्यानंतर राम रहीमची आई त्याला कारागृहात भेटण्यासाठी गेली होती. नंतर राम रहीमची तब्येत बिघडल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, वैद्यकीय चाचणीत तो फिट असल्याचं समोर आलं.

कारागृहात असलेल्या राम रहीमला एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिल्यानुसार औषधं दिलं जात आहेत. सुरुवातीला या औषधं अधिक प्रमाणात दिलं जात होती. मात्र, आराम मिळाल्यानंतर औषधांचं प्रमाण कमी करण्यात आलं.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हाय ब्लड प्रेशरसाठी राम रहीमला केल्केल्कीसिटीन, शुगरसाठी मेडफार्मिन आणि अॅसिडीटीसाठी सिपराजोल हे औषधं दिली जात आहेत.

राम रहीमनंतर हनीप्रीतलाही पोलिसांनी अटक केली असून ती पंचकूला कारागृहात बंद आहे. सुत्रांच्या मते, हनीप्रीतही कारागृहात जेवणं करत नाहीये.