रक्षाबंधनासाठी बनतेय खास 'सोन्या'ची मिठाई, पहा किंमत किती

काही दिवसांवर रक्षाबंधनाचा सण येऊन ठेपला आहे. 

Updated: Aug 23, 2018, 01:24 PM IST
रक्षाबंधनासाठी बनतेय खास 'सोन्या'ची मिठाई, पहा किंमत किती  title=

सुरत : काही दिवसांवर रक्षाबंधनाचा सण येऊन ठेपला आहे. रक्षाबंधनासाठी राख्या आणि विविध मिठायांनी बाजार सजायला सुरूवात झाली आहे. सण म्हटला की सोन्याची वस्तू येणं स्वाभाविक आहे. मात्र प्रामुख्याने हे दागिन्यांच्या स्वरूपात किंवा गिफ्टच्या माध्यमातून येते. रक्षाबंधनाच्या सणासाठी गुजरातमध्ये मात्र खास सोन्याची मिठाई बनवली जात आहे. 

सोन्याचा वर्ख 

सामान्यपणे मिठायांवर चांदीचा वर्ख लावला जातो. परंतू मिठाईवर सोन्याचा वर्ख लावून विकली जात आहे. सोन्याच्या वर्खातील मिठाई दिसायला अत्यंत सुंदर आहे. 

गुजरातमधील सुरतमध्ये बृज मिठाईवाला दुकानात सोन्याची मिठाई विकली जात आहे. या दुकानाच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, सार्‍या मिठायांवर यंदा 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे. जसे शरीराला मजबूत ठेवण्यासाठी लोकं सोन्याचं भस्म असलेले च्यवनप्राश खातात त्यापासून प्रेरणा घेऊन या नव्या स्वरूपात मिठाई सादर केल्याचे त्यांनी सांगितले आहे. ग्राहकांकडून या मिठाईबाबत उत्सुकता आणि विक्री दोन्ही उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. 

 

सोन्याच्या मिठाईची किंमत 

सोन्याचा वर्ख लावण्यात आलेल्या मिठाईची किंमत सुमारे 9000 रूपये प्रति किलोपासून सुरू आहे. ही मिठाई विविध स्वरूपात मिळणार आहे.