मुंबई : रक्षाबंधन म्हटलं की बहिणीला काय गिफ्ट द्यावं असा प्रश्न अनेकांना पडतो. तुमच्या बहिणीला यूनिक फायनांशिअल प्रोडक्सचा पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे गिफ्ट इतर गिफ्टपेक्षा नक्कीच वेगळं आहे, ते म्हणजे 'डिजिटड गोल्ड' होय. (Digital Gold).
डिजिटल फॉरमॅटमध्ये गोल्ड खरेदी करण्याचा पर्याय
डिजिटल गोल्डमध्ये असलेल्या गोल्ड ईटीएफ (gold ETFs), गोल्ड सेविंग फंड्स सारख्या डिजिटल फॉर्ममध्ये तुम्ही सोन्याची खरेदी करु शकता. डिजिटल गोल्डचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही फक्त 1 रुपयांपासूनही खरेदी करू शकता आणि मार्केटमध्ये होणाऱ्या चढ-उताराप्रमाणे खरेदी किंवा विक्री करू शकता.
डिजिटल पध्दतीने खरेदी केलेले गोल्डचं स्टोरेज ट्रेडिंग कंपनी किंवा ज्वेलरी ब्रँड करत असते. याचाच अर्थ असा की, फिजिकल गोल्ड प्रमाणे या डिजिटल गोल्डला सांभाळण्याची गरज भासत नाही. हे गिफ्ट तुमच्या बहिणीच्या पोर्टफोलिओला मजबूत करेल.
Gold खरेदी करणं आणखी सोप्प
सोनं खरेदी करायची प्रक्रिया बँकिंग कंपन्यांनी खुप सोप्पी केली आहे. तुमच्या स्मार्टफोनच्या सहाय्यानेही तुम्ही गोल्डची खरेदी किंवा विक्री काही मिनिटांत करू शकता.
Digital Gold ची खरेदी विक्री कुठे होते?
MMTC-PAMP India Pvt Ltd, Augmont Gold Ltd आणि Digital Gold India Pvt Ltd या भारतातील तीन मुख्य कंपन्या आहेत ज्या डिजिटल गोल्ड ऑफर करतात.
या कंपन्या सेफगोल्ड ब्रांडच्या (SafeGold brand) अंतर्गत हे प्रोडक्ट्स विकतात. अनेक पेमेंट बँक किंवा फायनांशिअल कंपन्या पार्टनरशिपमध्ये डिजिटल गोल्ड विकतात.
एअरटेल पेमेंट्स बँक त्यांच्या ऍपच्यामाध्यमातून सेफगोल्डसोबतच पार्टनरशिपमध्ये डिजीगोल्ड ऑफर करते. त्याचबरोबर, पेटीएम, गूगल पे, तनिष्क, मोबीक्वीक सारख्या डिजिटल वॅलेट ऍपचा वापर करुन देखील तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी किंवा विक्री करु शकता.
डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला 24 कॅरेट 99.50% शुद्ध सोनं मिळतं. तुम्ही खरेदी केलेल्या गोल्डला ट्रेडिंग कंपन्या किंवा प्रोवायडर एका सुरक्षित वॉल्टमध्ये ठेवतात. म्हणजे, फिजिकल गोल्ड प्रमाणे तुमचं सोनं चोरीला जाण्याची चिंता नसते. त्याचबरोबर, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही या डिजिटल गोल्ड खरेदी किंवा विक्री करु शकता.