Star Health | राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक असलेली कंपनीचा IPO खुला होणार; काय असावी स्ट्रॅटेजी? वाचा

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा IPO आज म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे. 

Updated: Nov 30, 2021, 10:16 AM IST
Star Health | राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक असलेली कंपनीचा IPO खुला होणार; काय असावी स्ट्रॅटेजी? वाचा title=

मुंबई :  दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा IPO आज म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे. आजपासून 2 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.

स्टार हेल्थने त्यांच्या IPO साठी 870-900 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. इश्यूच्या माध्यमातून 7249 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे नियोजन आहे. या इश्यूमध्ये ताज्या इक्विटी शेअर्सच्या इश्यूव्यतिरिक्त, विक्रीसाठी ऑफर (OFS) देखील असेल. जर तुम्ही देखील या IPO मध्ये पैसे गुंतवण्याची तयारी करत असाल तर आधी त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. झी बिझनेसचे व्यवस्थापकीय संपादक अनिल सिंघवी यांनीही यावर आपले मत मांडले आहे.

फक्त दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा
अनिल सिंघवी म्हणतात की, जे गुंतवणूकदार जोखीम घेऊ शकतात आणि दीर्घकालीन गुंतवणूक ठेवू शकतात त्यांनी स्टार हेल्थच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करावी. शेअर लिस्ट झाल्या झाल्या नफा होईलच असे नियोजन करणाऱ्या गुंतवणुकदारांनी या आयपीओचा विचार करू नये. 

दीर्घकालीन गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अधिक शेअर्स  घेऊ शकतात. तुम्हाला रिस्क घेण्याची इच्छा नसेल तर तुम्ही या आयपीओपासून दुर राहू शकता.

कंपनीचे सकारात्मक आणि नकारात्मक
अनिल सिंघवी सांगतात की, कंपनीचा नफ्याचा ट्रॅक रेकॉर्ड मजबूत आहे. प्रवर्तक देखील मजबूत आहेत. आरोग्य विम्याच्या व्यवसायात कंपनी बाजारातील आघाडीवर आहे. कंपनीचा बाजारातील हिस्सा दुहेरी अंकी आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला हे देखील कंपनीच्या प्रवर्तकांपैकी एक आहेत, ज्यांची सुमारे 17.5 टक्के भागीदारी आहे. चांगली गोष्ट म्हणजे झुनझुनवाला IPO मधील आपला हिस्सा विकत नाहीये. त्यांचा कंपनीवर पूर्ण विश्वास आहे.

मात्र, नकारात्मक बाब म्हणजे या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत कंपनी तोट्यात आहे. गेल्या आर्थिक वर्षातही तोट्यात होता. तथापि, आणखी नफा अपेक्षित आहे. कंपनीने मार्च 2021 मध्ये प्रवर्तकांना 490 रुपयांना शेअर्स वाटप केले होते.

IPO बद्दल
स्टार हेल्थच्या आयपीओमध्ये 2,000 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी शेअर्स केले जातील. त्याच वेळी, 5.83 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) देखील असेल. सध्याचे शेअरहोल्डर्स ऑफर फॉर सेलद्वारे त्यांचे स्टेक कमी करतील.

यापैकी 3.06 कोटी शेअर्स सेफक्रॉप इन्व्हेस्टमेंट्स इंडिया एलएलपीद्वारे विकले जातील. कोणार्क ट्रस्ट आणि MMPL ट्रस्टद्वारे 1,37,816 आणि 9,518 इक्विटी शेअर्सची विक्री केली जाईल. 

APIS ग्रोथ द्वारे सुमारे 6 76,80,371 इक्विटी शेअर्स विकले जातील, तर MIO IV स्टार आणि MIO स्टार या दोघांद्वारे 41,10,652 इक्विटी शेअर्स विकले जातील. 

युनिव्हर्सिटी ऑफ नोट्रे डेम DU LAC 74,38,564 इक्विटी शेअर्स विकणार आहे. ROC Capital Pty Limited, वेंकटसामी जगन्नाथन, साई सतीश आणि बर्जिस मीनू देसाई हे देखील शेअर्स विकतील.

किंमत बँड आणि लॉट आकार
स्टार हेल्थने त्यांच्या IPO साठी 870-900 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. तर लॉट साइज 16 शेअर्सचा असेल. किमान एक लॉट खरेदी करणे आवश्यक आहे. 

900 रुपयांच्या वरच्या प्राइस बँडच्या बाबतीत, या इश्यूमध्ये किमान 14400 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यानंतर, 16 शेअर्सच्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते.

बुक रनिंग लीड मॅनेजर
बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, सीएलएसए इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, क्रेडिट सुईस सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, जेफ्रीट प्राइवेट लिमिटेड, जेफ्रीट इंडिया. प्रायव्हेट लिमिटेड, डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड चा सामावेश आहे.

 तर रजिस्ट्रार KFin Technologies Private Limited आहेत.

---

हेही वाचा
ओमायक्रॉनबाबत अमेरिकी अध्यक्षांच्या एका वक्तव्याने जगभरातील शेअर बाजार पुन्हा तेजीत
Gold Rate Today | लग्नसराईत सोन्याचे भाव पुन्हा घसरले; तुम्ही खरेदी केले का?