मुंबई : ओमिक्रॉन या कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकारामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातही अस्थिरता आहे. दरम्यान, मेटल स्टॉक्सवर नव्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होत आहेत. या PSU शेअर्सपैकी एक स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) चा आहे.(JP Morgan call on SAIL share)
ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने मेटल स्टॉक सेलमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गनने सेलवर 'ओव्हरवेट' (SAIL Overweight) रेटिंगसह 165 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील हा आवडता स्टॉक आहे.
SAIL: 52% परतावा अपेक्षित
PSU स्टॉक सेलच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न दिला आहे. गेल्या एका वर्षात स्टॉकने 96% परतावा दिला आहे. मात्र, या काळात सेलच्या शेअरने मे महिन्यात 146 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. या वर्षी आतापर्यंत, स्टॉकमध्ये सुमारे 45% वाढ झाली आहे.
हेदेखील वाचा - Job in Tesla | टेस्लामध्ये नोकरी करण्याची संधी; जाणून घ्या कसे करायचे अप्लाय
हेदेखील वाचा - Credit Card च्या कर्जाचा आकडा कमी होत नाहीय? या जाचातून बाहेर येण्याचे 3 उपाय
ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने 165 रुपयांच्या लक्ष्यासह सेल ओव्हरवेटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. 7 डिसेंबर रोजी सेलच्या सध्याच्या शेअरची किंमत 108 रुपये प्रति शेअर होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना 57 रुपये म्हणजेच सध्याच्या किमतीच्या सुमारे 53 टक्के परतावा मिळू शकतो.
राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक (Rakesh Jhunjhunwala)
राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) चे शेअर्स खरेदी केले. त्यांनी सेलमध्ये 0.4 टक्के हिस्सा वाढवला होता. राकेश झुनझुनवाला यांची सेलची एकूण होल्डिंग 1.8 टक्के आहे.
7 डिसेंबर रोजी त्याची सध्याची किंमत 777.9 कोटी रुपये आहे. राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफे म्हटले जाते. असे म्हटले जाते की किरकोळ गुंतवणूकदार त्यांचा पोर्टफोलिओ पाहून त्यांची रणनीती बनवतात.