राकेश झुनझुनवालांचे 2 मल्टीबॅगर स्टॉक, आणखी पैसा खेचण्याच्या तयारीत; तुमच्या पोर्टफोलिओ आहे का?

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये मल्टीबॅगर शेअर्सची कमी नाही. गेल्या 1 वर्षात अनेक शेअर्सने डबल ट्रिपल रिटर्न दिले आहेत.

Updated: Oct 4, 2021, 04:15 PM IST
राकेश झुनझुनवालांचे 2 मल्टीबॅगर स्टॉक, आणखी पैसा खेचण्याच्या तयारीत; तुमच्या पोर्टफोलिओ आहे का? title=

मुंबई : भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये मल्टीबॅगर शेअर्सची कमी नाही. गेल्या 1 वर्षात जर रिटर्न चार्ट पाहिला तर अनेक असे शेअर आहेत. ज्यांनी दुप्पट, तिप्पट परतावा दिला आहे. या मध्ये 2 असे मल्टीबॅगर शेअर्स आहेत. की ज्यामध्ये ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की,  1 वर्षात या शेअर्समध्ये चांगली रॅली पाहायला मिळू शकते. TATA MOTORS आणि jubilant Ingrevia या दोन स्टॉक्समध्ये ब्रोकरेज हाऊसने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकने अनुक्रमे मागील 1 वर्षात 154 टक्के आणि 181 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

TATA MOTORS 
टाटा मोटर्समध्ये ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओस्वालने फ्रेश गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 400 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. सध्या हा शेअर 340 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. म्हणजेच प्रति शेअर 60 रुपयांचा नफा होऊ शकतो. कोरोनातून भारतीय बाजार बाहेर येत असून खासगी वाहनांची मागणी वाढत आहे. तसेच कंपनीचा फोकस इलेक्ट्रिक व्हेहिकल्सवर देखील आहे. त्याचा येत्या काळात फायदा होणार आहे.

Jubilant Ingrevia 
या शेअरमध्ये ब्रोकरेज हाऊस HDFC Securities ने फ्रेश गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. यासाठीचे लक्ष 795 रुपये ठेवले आहे. आता शेअर 750 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे. म्हणजेच प्रति शेअर अजुनही 45 रुपयांचा नफा शक्य आहे. हा शेअर 844 च्या लेवलपर्यंतही पोहचू शकतो.