काश्मीरच्या खो-यातल्या दहशतवाद्यांना 2 तरूणींनी दिला इशारा

काश्मीरच्या खो-यातल्या दहशतवाद्यांना या दोघा तरूणींनी इशारा दिलाय.

Updated: Jan 2, 2018, 10:25 PM IST
काश्मीरच्या खो-यातल्या दहशतवाद्यांना 2 तरूणींनी दिला इशारा  title=

मुंबई : काश्मीरच्या खो-यातल्या दहशतवाद्यांना या दोघा तरूणींनी इशारा दिलाय.

शहीद तुफैल अख्तरच्या या दोघी मुली.  वडिलांनी देशासाठी बलिदान दिल्यानंतर अश्रू ढाळण्यापेक्षा, त्या दोघी खंबीरपणे उभ्या राहिल्याया आबहेत. बदलत्या काश्मीरमधल्या या धाडसी मुलींचं कौतुक केलं आहे. सीआरपीएफचे शहीद कॉन्स्टेबल तुफेल अहमदच्या मुलींची ही गर्जना. दहशतवादाविरोधात आता काश्मीरच्या पोरी खंबीरपणे उभ्या राहणार आहेत, याचाच हा इशारा असल्याचे म्हटले जात आहे. 

पुलवामाच्या लेथपोरामधल्या सीआरपीएफ कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेडकॉनस्टेबल तुफेलसह पाच जवान शहीद झाले. शहीद तुफैल राजौरीच्या डोडासनचे... शहीद तुफेल यांना शेवटची सलामी देण्यासाठी अख्खं राजौरी उपस्थित होते. शहीद तुफैल यांना दोन मुली आणि दोन मुलं आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांना चोख उत्तर द्यायला हवं, असं त्यांच्या मुलांचं म्हणणं आहे.

शहीद तुफैल यांच्या मुली आता दहशवाद्यांविरोधात उभ्या ठाकल्यायत... काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना इशारा देणा-या या मुलींच्या धाडसाचं कौतुक....