नवी दिल्ली : देशातली दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी बँक अशी ओळख असलेल्या स्टेट बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं रजनीश कुमार यांच्याकडे जाणार आहेत.
एक वर्षाची मुदतवाढ मिळालेल्या स्टेट बँकेच्या विद्यमान अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, उद्या निवृत्त होत आहेत. 7 ऑक्टोबरला रजनीश कुमार अध्यक्षपदाची सूत्रं स्विकारतील. १९८० मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदावर स्टेट बँकेत रुजू झालेले रजनीश कुमार, २०१५ मध्ये स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालकपदी विराजमान झाले.
रजनीश कुमार यांच्यासमोर सातत्यानं वाढणारी थकीत कर्जं, सहा बँकांच्या विलीनीकरणानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि इतरही आव्हानं असणार आहेत.