नवी दिल्ली : राधे मॉंच्या दर्शनासाठी पोलीस ठाण्याचे लोटांगण घातल्याचे दिसून आले. पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत चक्क राधे मॉं बसल्याचे पाहायला मिळाले. तर काही पोलिसांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात.
राधे मॉं हिच्यावर गंभीर आरोप असतानाही दिल्ली पोलिसांनी राधे मॉंच्या दर्शनासाठी रांगा लावल्या त्याही चक्क पोलीस ठाण्यातच. राधे मॉं रात्री १ वाजता विवेक विहार पोलीस ठाण्यात हजर झाली. त्याचवेळी त्यांनी पोलीस ठाण्याच्या प्रमुख संजय शर्मा यांच्या खुर्चीचा ताबा घेतला.
Self styled god woman Radhe Ma welcomed at Vivek Vihar police station in Delhi, sat on chair of SHO pic.twitter.com/0hbkTLpr5K
— ANI (@ANI) October 5, 2017
संजय शर्मा यांना राधे मॉं हिने आर्शीवाद दिला तसेच गळ्यात शाल घातली. आता पोलीस ठाण्याचे प्रमुखच दर्शन घेत आहेत म्हटल्यावर सगळे पोलीस राधे मॉंच्या दर्शनाला हजर झाले.
#WATCH Policemen seen singing with self styled god woman Radhe Ma in Delhi's GTB Enclave pic.twitter.com/XOIAr2vKHf
— ANI (@ANI) October 5, 2017