...म्हणून जनता मोदींसोबत आहे!

भाजपा ला गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुर्ण बहूमत मिळाले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 18, 2017, 12:36 PM IST
...म्हणून जनता मोदींसोबत आहे! title=

नवी दिल्ली : भाजपा ला गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुर्ण बहूमत मिळाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग म्हणाले...

यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, "आमच्या आशेनुसार निकाल लागला आहे. आम्ही दोन्ही राज्यात पुर्ण बहूमत प्राप्त करून सत्तेवर आलो आहे."

मोदींवर लोकांचा विश्वास आहे का ?

विधानसभेचा हा निकाल पाहता पंतप्रधान मोदींवर लोकांचा विश्वास आहे का ? असे विचारताच राजनाथ म्हणाले, "हा नक्कीच. हा मोदींच्या विकास कार्यावर लोकांची आस्था आहे. त्याचबरोबर हे यश देखील मोदी सरकारच्या कामाचा परिणाम आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात भाजप सत्तेवर येणार आहे."

भाजपचे नेते प्रकाश जावडेकरांचे देखील असेच मत आहे.

राजकारणाचा मंत्र 

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री यांनी सांगितले की, "सध्या राजकारणाचा मंत्र विकास आहे. त्यामुळे जनता मोदींसोबत आहे."