नवी दिल्ली : तालिबानच्या उदयानंतर भारताच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारताचे सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑस्ट्रेलियाचे सरंक्षण मंत्री पीटर डटन यांच्याशी बोलताना म्हटले की, तालिबानच्या मदतीने अफगानिस्तानमध्ये ठिय्या मांडून बसलेले दहशतवादी वैश्विक शांततेसाठी धोका आहेत.
राजनात सिंह यांनी म्हटले की, अफगानिस्तानच्या जमिनीचा वापर अन्य कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी तसेच, धमकवण्यासाठी व्हायला नको. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला म्हटले आहे की, अफगानिस्तानवर युएन सेक्योरिटी काऊंसिल रिझॉल्युशन 2593 लागू व्हावे.
जम्मू - काश्मीरमधील शांततेला धोका
भारतीय डेलिगेशनने याबाबतीत चिंता व्यक्त केली की, तालिबानच्या वाढत्या शक्तीमुळे जम्मू - काश्मिरमधील शांतता धोक्यात येऊ शकते. अफगानिस्तानच्या जमिनीवरून निर्माण झालेला दहशतीचा धोका येथपर्यंत पोहचू शकतो.
दरम्यान ब्रिटेनची गुप्तचर एजेंसी MI 5 चे प्रमुख केन मॅक्कलमने म्हटले आहे की, अफगानिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर पुन्हा 9/11 सारखा हल्ला होऊ शकतो. अफगानिस्तानवर तालिबानच्या ताब्यानंतर दहशतवाद्यांचे मनोबल वाढले आहे.