नरेंद्र मोदींच्या शपथविधीला रजनीकांत राहणार उपस्थित

मोदींच्या मंत्रीमंडळाचा येत्या 30 मे रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Updated: May 28, 2019, 04:30 PM IST
नरेंद्र मोदींच्या शपथविधीला रजनीकांत राहणार उपस्थित  title=

नवी दिल्ली : मोदी सरकारचा लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये दणदणीत विजय झाला. एकट्या भाजपने स्वबळावर ३०३ जागा तर एनडीएने ३५३ जागा मिळवल्या आहे. मोदींच्या मंत्रीमंडळाचा येत्या ३० मे रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधीला देशा-विदेशातील अनेक दिग्गज नेते आणि इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत. यासोबतच या शपथविधीला दक्षिणात्या अभिनेता रजनीकांत देखील हजेरी लावणार आहे.

 

रजनीकांत यांनी मोदींचं या विजयासाठी अभिनंदन केले. हा विजय केवळ मोदींचाच आहे. ते एक दिग्गज नेते आहेत. या शब्दात रजनीकांतने मोदींचं कौतुक केलं. मी मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

मंगळवारी चेन्नईतील आपल्या राहत्या घरी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 'जवाहरलाल नेहरु, राजीव गांधी यांच्यानंतर मोदी हे प्रतिभावान नेता म्हणून उद्यास आले आहेत'. असे देखील म्हणाले. 

रजनीकांतने एनडीएचे देखील कौतुक केलं. 'नितीन गडकरी यांनी गोदावरी प्रकल्पासाठी काम केले आहे. त्यांनी तमिळनाडूकडे देखील लक्ष द्यायला हवे. सोबतच राज्यात फूडप्रोडक्ट आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.'

राहुल गांधीना सल्ला

नरेंद्र मोदींच्या कौतुक करत असताना रजनीकांत यांनी राहुल गांधी यांना सल्ला देखील दिला. राहुलमध्ये नेतृत्वक्षमता नाही, असं नाही. परंतु एक युवा नेता म्हणून त्यांना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सांभाळन जरा अवघड होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राजीनामा नाट्य

राहुल गांधींनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा नाही दिला पाहिजे. त्यांनी आपण पुढे काय करु शकतो, आपले नेतृत्व त्यांनी सिद्ध करुन दाखवायला हवं. सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधक हा तगडा असायला हवा असं देखील रजनीकांत यांनी म्हटलं आहे.