अश्लिल व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने 7 गावांमध्ये दहशत; नराधमामुळे मायलेकीनं संपवलं आयुष्य

Rajasthan Crime : मैत्रीच्या बहाण्याने 40 हून अधिक महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवून ब्लॅकमेल केल्याच्या खळबळजनक प्रकरणात राजस्थान येथील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 10, 2023, 12:03 PM IST
अश्लिल व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने 7 गावांमध्ये दहशत; नराधमामुळे मायलेकीनं संपवलं आयुष्य title=

Rajasthan Crime : राजस्थानमधील (Rajasthan News) बाडमेरमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. बाडमेरमध्ये लग्नसमारंभात ढोलकी वाजवणाऱ्या एका तरुणाने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. बलात्कार (sexualy assult) करताना आरोपी तरुणाने महिलांचे अश्लील व्हिडिओही बनवले. नंतर त्याने अश्लील व्हिडिओच्या नावाखाली महिलांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. राजस्थानमध्ये या महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी (Rajasthan Police) आरोपीला अटक केली आहे.

आरोपीने अनेक महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुण लग्नात ढोलकी वाजवण्याचे काम करतो. त्याच दरम्यान तो मुली आणि महिलांसोबत ओळख वाढवून त्यांच्यावर शारिरीक अत्याचार करायचा आणि त्याचे व्हिडीओ शूट करायचा. त्यानंतर अश्‍लील व्हिडिओ आणि फोट काढून आरोपी महिला आणि मुलींना ब्लॅकमेल करायचा. बाडमेर जिल्ह्यातील एका गावात काही महिला आणि मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असल्याचे समोर आले. त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून एक पेन ड्राईव्ह आणि मोबाईल जप्त करून तपास सुरू केला. 

आरोपीने 40 हून अधिक महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. त्यापैकी एका महिलेने आणि तिच्या मुलीने या तरुणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक केली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. याप्रकरणात मुकेश दमामी नावाच्या तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती राजस्थान पोलिसांनी दिली आहे.

आरोपी मुकेश दमामी आजूबाजूच्या गावात घरोघरी जाऊन ढोलकी वाजवण्याचे काम करत होता. त्यावेळी आरोपी महिला व मुलींना मोबाईल नंबर देत असे व त्यांचेही नंबरही घेत असे. त्यानंतर फोनवर बोलून तो त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर आरोपी महिला व अल्पवयीन मुलींना नशेची गोळी टाकून शीतपेय प्यायला देऊन फसवत असत. यानंतर आरोपी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढत. नंतर तेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी महिलांना ब्लॅकमेल करायचा आणि त्यांच्याकडून पैसे लुटायचा आणि बळजबरीने शारीरिक संबंधही ठेवायचा.

काही महिला आणि मुलींचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ते गावातील एका तरुणापर्यंत पोहोचले. तरुणाने गावकऱ्यांसह पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुकेश दमामी याला अटक केली आहे. मात्र या नराधामुळे मायलेकींनी आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे. दुसरीकडे आरोपी हा शेजारच्या सात गावांमध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करायचा. त्यामुळे आरोपीने आपल्या घरातील मुलींसोबतही असेच केले असेल का? अशी भीती या सात गावातील गावकऱ्यांना वाटत आहे.