बुराडी सामुहिक आत्महत्याकांडाची पुनरावृत्ती! एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य

राजस्थानमधल्या बिकानेर जिल्ह्यातील एक हादरवाणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या केली. यातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकवण्यात आले होते. तर कुटुंबातील प्रमुख पुरुषाने विषप्राशन करुन जीवन संपवलं.  

राजीव कासले | Updated: Dec 14, 2023, 08:39 PM IST
बुराडी सामुहिक आत्महत्याकांडाची पुनरावृत्ती! एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य title=

Rajasthan : 2018 मध्ये दिल्लीतल्या बुराडी परिसरात राहाणाऱ्या एकाच कुटुंबातील 11 जणांच्या आत्महत्येने (Burari Death Case) संपूर्ण देश हादरला होता. आता राजस्थानमध्ये याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. राजस्थानमधल्या (Rajasthan) बिकानेर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांनी जीवन संपवलं. मृतांमध्ये पती-पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. यातील चार जणांचा मृतदेह फासावर लटकवण्यात आले होते. तर एका विष प्राशन करत आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचही जणांचे मृतदेह ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. (five people committed suicide)

काय आहे नेमकी घटना
बिकानेर जिल्ह्यातील मुक्ता प्रसाद नगर भागातील अंत्योदय नगरमध्ये हनुमान सोनी पत्नी आणि तीन मुलांसह रहात होते. गुरुवारी दुपारी संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. हे कुटुंब कर्जामुळे नैराश्यात होतं अशी माहिती पोलिसांनी दिलीय. याच नैराश्यातून हनुमान सोनी यांनी पत्नी आणि तीन मुलांसह सामुहिक आत्महत्या केली. हनुमान सिंह यांनी आधी पत्नी आणि तीन मुलांना फासावल लटकावलं. त्यानंतर स्वत: विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. 

या घटनेने राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी यांच्या व्यतिरिक्त दोन मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून डॉग स्कॉडचीही मदत घेतली जात आहे. मृत हनुमान सोनी यांच्या शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनी कुटुंब आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त होतं. पण आत्महत्येचं हेच कारण होतं, की आणखी काही कारण आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. 

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहाणाऱ्या महिलेची तिच्या जोडीदाराने हत्या केली. त्यामुळे पुन्हा एकला लिव्ह इनबाबत वाद निर्माण झाला आहे. संसदेच्या हिंवाळी अधिवेशनात लिव्ह इनला बंदी घालण्याची मागणी भाजप खासदाराने केली होती. लिव्ह इन पद्धतीमुळे देशातील संस्कृतीला धोका पोहोचत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यासाठी त्याने श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा दाकला दिला होता. आता पुन्हा तशीच घटना मथूरेत घडली आहे. मथूरेतल्या गोवर्धन परिसरात एक महिला शम्मी नावाच्या एता तरुणाबरोबर लिव्ह इनमध्ये रहात होती. 

दोघांमध्ये काही कारणाने भांडण झालं आणि यातूनच शम्मीने त्याच्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली. मृत महिलेचं नाव हरजिंदर कौर असल्याचं समजतंय. 10 डिसेंबरला शम्मीचा वाढदिवस होता. दोघांनी बाहेरून जेवण मागवलं. जेवत असताना एकमेकांना टोमणे मारणं सुरु होतं. यावरुनच दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. संतापलेल्या शम्मीने हरजिंदरचा गळा दाबून तिची हत्या केली.