Rajasthan New CM: पहिल्यांदा आमदार होऊन थेट CM! कोण आहेत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा?

Rajasthan New CM Bhajanlal Sharma: भजनलाल शर्मा  यांची राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 12, 2023, 05:20 PM IST
Rajasthan New CM: पहिल्यांदा आमदार होऊन थेट CM! कोण आहेत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा? title=

Who is Bhajanlal Sharma: छत्तीसगड आणि मध्य प्रदेशपाठोपाठ आता राजस्थानमध्येही मुख्यमंत्र्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात नव्या चेहऱ्यांना नेतृत्वदेऊन भाजप हायकमांडने सर्वांनाचा आश्चर्यचकीत केले आहे.  भजनलाल शर्मा  यांची राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. पण भजनलाल शर्मा कोण आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

राजस्थानमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना राजस्थानचे निरीक्षक बनवले होते. ज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना दुपारी एक वाजता भाजपच्या जयपूर कार्यालयात बोलावण्यात आले होते. या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावावर मोहोर उमटवण्यात आली. भजनलाल हे राजस्थानच्या भरतपूर मतदारसंघाचे मतदार आहेत.

भरतपूर येथील रहिवासी भजनलाल शर्मा हे दीर्घकाळापासून भाजपसोबत कार्यरत आहेत. सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून भाजपने त्यांना पहिल्यांदाच निवडणूक लढवायला लावली. 

विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली होती. सांगानेर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भजनलाल शर्मा विजयी झाले. संघटनेतील महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद दिल्याने सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजस्थानच्या एकूण 200 विधानसभा जागांपैकी 199 जागांवर निवडणूक झाली. त्यापैकी भाजपला 112, काँग्रेसला 72 आणि अपक्षांना 12 जागा मिळाल्या आहेत.

त्यांच्याकडे 46 लाख 56 हजार 666 रुपये इतकी संपत्ती आहे. भजनलाल शर्मा यांनी आपले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. तसेच जयपूरच्या राजस्थान विद्यापीठातून त्यांनी एमए पॉलिटिक्सचे शिक्षण घेतले आहे.