Crime News : राजस्थानच्या भीलवाडात (Bhilwara) देशाला हादरवणारी घटना घडली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. कोणताही पुरावा राहू नये यासाठी आरोपींनी तिचा मृतदेह जंगलातील कोळसा भट्टीत (Coal Furnace) टाकला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. आरोपींच्या जबाबात धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपींनमध्ये एक अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. चारपैकी दोघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर वार करत तिला बेशुद्ध केलं. पुरावा राहू नये यासाठी त्यांनी मुलीला कोळसा भट्टीत जीवंत जाळलं. जळालेल्या मृतदेहाचे काही तुकडे त्यांनी जवळच्या तलावात फेकून दिले. पोलिसांना कोळसा भट्टीत मुलीच्या बांगड्या आणि काही हाडं सापडली.
अल्पवयीन मुलगी (Minor Girl) आपल्या आईबरोबर जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. दुपारी आई घरची काम उरकायची असल्याने घरी परतली. मृत मुलगी एकटीच जंगलात होती. दुपारच्या वेळेस कोळसा भट्टीत काम करणाऱ्या 21 वर्षांच्या कान्हा आणि 25 वर्षांच्या कालू या दोघांनी मुलीवर बलात्कारकेला. त्यानंतर तिच्या डोक्यावर वार करत तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर त्यांनी मुलीला पेटत्या कोळसा भट्टीत टाकून दिलं आणि तिथून निघून गेले. रात्री ते पु्न्हा कोळसा भट्टीजवळ आले. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे ते घाबरले आणि मृतदेहाचे तुकडे एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून ते जवळच्या तलावात फेकून दिले.
ग्रामस्थांनी शोध सुरु केला
दुसरीकडे रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी आणि गावातील लोकांना तिचा शोध सुरे केला. शोध घेत असताना जंगलातील एका कोळसा भट्टीच्या बाहेर मुलीची चप्पल पडलेली दिसली. त्यामुळे त्यांनी भट्टीतली लाकडं बाजूला केली असता जळालेल्या अवस्थेत मुलीची हाडं सापडली.
आरोपींच्या पत्नींची मदत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात दोन्ही आरोपींच्या पत्नी आणि कुटुंबाचाही समावेश होता. दरम्यान याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आलं आहे. भाजपने राजस्थानमधल्या गेहलोत सरकावर जोरदार टीका केली आहे. गुर्जर समाज आणि भाजप नेत्यांनी पोलिस स्थानकाबाहेर घेराव घालून घोषणाबाजी केली. मृत मुलीच्या कुटुंबियांना एक कोटी रुपे आणि सरकारी नोकरी देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
अल्पवयीन मुलीचं अपहरण, सामुहिक अत्याचर आणि हत्येच्या तपासासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डी यांनी पक्षाच्या चार महिला खासदारांची समिती बनवली आहे. या समितीत सरोज पांड्ये, रेखा वर्मा, कान्ता कर्दम आणि लॉकेट चॅटर्जी या खासदारांचा समावेश आहे.