कर्मचाऱ्यांच्या नेटवर्कसाठी रेल्वेचा 'जिओ'शी करार

१२५ रुपयांचा मासिक प्लॅन उपलब्ध असणार आहे.

Updated: Jan 2, 2019, 05:26 PM IST
कर्मचाऱ्यांच्या नेटवर्कसाठी रेल्वेचा 'जिओ'शी करार title=

नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या निमित्ताने रिलायन्स जिओने रेल्वे प्रशासनात कार्यरत असलेल्या लोकांसाठी आकर्षक ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओने भारतीय रेल्वेसोबत करार केला आहे. जिओ रेल्वे कर्मचाऱ्यांना कनेक्शन देणार आहे. ही सुविधा १ जानेवारी २०१९ पासून सुरु झाली आहे. .याऑफरच्या अंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बिलमध्ये ३५ टक्के सूट देण्यात येणार आहे.  जिओकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रतिमहिना हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिगची सुविधा देण्यात येणार आहे. एअरटेल कंपनी ६ महिन्यांपासून भारतीय रेल्वेला  इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा पुरवत होती. 

जिओ रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे प्लॅन उपलब्ध करुन देणार आहे. रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना १२५ रुपयांचा मासिक प्लॅन उपलब्ध असणार आहे. यामध्ये त्यांना ६० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येणार आहे. संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना ९९ रुपयांचा मासिक प्लॅन उपलब्ध करुन दिला आहे. त्यामध्ये  ४५ जीबी आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येणार आहे. सी ग्रुपमधील कर्मचाऱ्यांना मासिक  ६७ रुपये  द्यावे लागणार आहेत. या संपूर्ण बिलाची रक्कम भारतीय रेल्वेकडून देण्यात येणार आहे.