रेल्वेतून तुम्ही घरबसल्या कमवू शकता १० लाख रुपये

रेल्वे तुम्हाला घरबसल्या कमावण्याची संधी घेऊन आलीये. रेल्वेद्वारे तुम्ही घरी बसून १० लाखापर्यंत कमवू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाहीये. रेल्वेच्या विकासाठी तुम्हाला फक्त कल्पना सुचवायची आहे. मात्र अट अशी की तुमची ही कल्पना हटके आणि वेगळी असली पाहिजे. 

Updated: Mar 28, 2018, 08:58 AM IST
रेल्वेतून तुम्ही घरबसल्या कमवू शकता १० लाख रुपये  title=

मुंबई : रेल्वे तुम्हाला घरबसल्या कमावण्याची संधी घेऊन आलीये. रेल्वेद्वारे तुम्ही घरी बसून १० लाखापर्यंत कमवू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाहीये. रेल्वेच्या विकासाठी तुम्हाला फक्त कल्पना सुचवायची आहे. मात्र अट अशी की तुमची ही कल्पना हटके आणि वेगळी असली पाहिजे. 

इन्कम वाढवण्याचा प्रयत्न

प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेने इन्कम वाढविण्याचे प्रयत्न सुरु केलेत. यासाठी रेल्वेने एक योजना सुरु केलीये. 'How to Raise Money For Railways To Provide Better Services' म्हणजेच चांगली सेवा प्रदान करण्यासाठी रेल्वेचे इन्कम कसे वाढता येईल असे या योजनेला नाव देण्यात आलेय. रेल्वेला कल्पना सुचवणाऱ्यांना रेल्वेकडून १० लाख रुपये बक्षीस जाहीर केलेय. 

दुसऱ्या विजेत्याला ५ लाख रुपये

या स्पर्धेत दुसऱा क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला ५ लाख रुपये आणि तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या ३ लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय चौथा क्रमांक पटकावणाऱ्याला १ लाख रुपये मिळणार आहेत. जर तुम्हाला या स्पर्धेत https://innovate.mygov.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करा. 

असे व्हा सहभागी

सर्वात आधी  https://innovate.mygov.in वर जाऊन क्लिक टू पार्टिसिपेट वर क्लिक करा. येथे दिलेल्या गाईडलाईन काळजीपूर्वक वाचा. यानंतर खाली दिलेल्या लॉगइन टू पार्टिसिपेटवर क्लिक करा. येथे तुमचा ई-मेल अथवा मोबाईल नंबरने लॉगइन करा. आता ऑनलाईन फॉर्ममध्ये सर्व माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशनचा मेल येईल. 

ही आहे अट

रेल्वेकडून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक अट ठेवण्यात आलीये. तुम्ही सुचवलेली कल्पना एक हजाराहून अधिक शब्दांची असता कामा नये. यासाठी २५० शब्दांचा निष्कर्ष असणेही गरजेचे आहे. भाग घेण्यालाछी तुम्हाला तुमची आयडिया पीडीएफ अथवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पाठवावे लागेल. फाईलची साईझ ८ एमबीपेक्षा जास्त असता कामा नये. 

शेवटची तारीख

जर तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचाय तर १९ मेपर्यंक संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन फॉर्म जमा करु शकता. तुम्ही तुमची आयडिया इंग्रजी अथवा हिंदी भाषेत देऊ शकता. 

अर्हता

या स्पर्धेत भाग घेणाऱ्या उमेदवाराचे वय २० मार्च २०१८ रोजी १८ वर्षांपेक्षा अधिक असावे. भारतीय रेल्वेचे कर्मचारी यात सहभागी होऊ शकत नाहीत.