Railway Job: रेल्वेत तब्बल 9144 जागांवर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

Railway Recruitment:  रेल्वेमध्ये शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 9 हजारहून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 26, 2024, 01:33 PM IST
Railway Job: रेल्वेत तब्बल 9144 जागांवर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज title=
Railway RRB Technician Bharti

Railway Recruitment: तुम्ही दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण आहात? चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. रेल्वेमध्ये शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 9 हजारहून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड  म्हणजेच आरआरबी अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II च्या रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या विविध पदांच्या एकूण 9144 जागा भरल्या जातील.टेक्निशियन ग्रेड 1 आणि टेक्निशियन ग्रेड 2 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण  असणे आवश्यक आहे. तसेच यासोबत आयटीआय उत्तीर्णही असावे. उमेदवाराने एसएसएलसी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.  NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून SSLC किंवा ITI उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र  तुमच्याकडे असायला हवे.

निवड प्रक्रिया

टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कशी केली जाणार आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेची माहिती कळवण्यात येईल. सर्वप्रथम कॉम्प्युटर बेस्ड चाचणी द्यावी लागेल.  CBT1 परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागले. उमेदवाराला त्यानंतर CBT2 परिक्षा द्यावी लागेल.  CBT2 परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर  कागदपत्र  पडताळणीची प्रक्रिया पार पडेल. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. यावेळी तुम्ही भरलेला अर्ज आणि सोबत जोडलेली कागदपत्रे तपासली जातील. खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्यांची संभाव्य नोकरी मिळण्यााधीच जाऊ शकते. यानंतर उमेदवारांची मेडिकल टेस्ट घेतली जाईल. या सर्व टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. 

वयोमर्यादा आणि पगार 

टेक्निशियन ग्रेड 1 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षांदरम्यान असावे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 29 हजार 200 रुपये पगार दिला जाणार आहे. टेक्निशियन ग्रेड 2 पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षे इतके असावे.  या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. 

अर्ज शुल्क 

खुल्या गटातील उमेदवारांकडून 500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. तर एससी, एसटी, माजी सैनिक, पीडब्ल्यूईडी आणि महिला उमेदवारांकडून 250 रुपये इतके शुल्क घेतले जाईल, याची नोंद घ्या. 

अर्जाची शेवटची तारीख 

8 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या. तसेच अर्जामध्ये खरी माहिती भरा.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा