Railway Recruitment Board 2022 Vacancy: रेल्वेत काम करण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी तयारी करतात. पण प्रत्येकाला नोकरी मिळतेच असं नाही. काही जणांच्या पदरी निराशा देखील पडते. आता रेल्वेतील 21 रिक्त पदांसाठी थेट भरती केली जाणार आहे. ही भरती क्रीडा कोट्याद्वारे केली जाणार आहे. रेल्वे थेट भरती अधिसूचना 2022 अधिकृत वेबसाइट rrc-wr.com वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती चाचणी आणि क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन, शैक्षणिक पात्रता या आधारे केली जाईल. यासाठी कोणतीही वेगळी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 92300 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वे नोकऱ्या 2022 साठी निर्धारित कालावधीत अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे म्हणजेच उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 1998 पूर्वी झालेला नसावा आणि 1 जानेवारी 2005 नंतर झालेला नसावा. वयोमर्यादेत कोणतीही सूट देण्याची तरतूद नाही, कारण पदांसाठी कोणतंही आरक्षण धोरण लागू नाही.
रेल्वे थेट भरती प्रक्रिया विविध निवड टप्प्यांतून केली जाईल. ज्यामध्ये क्रीडा क्षेत्रातील कामगिरी, शैक्षणिक पात्रता चाचणी आणि मूल्यांकन यांचा समावेश आहे. भारतीय रेल्वे संघासाठी योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी चाचणी केली जाईल. चाचणीच्या आधारावर उमेदवारांना 'FIT' किंवा 'UNFIT' म्हणून घोषित केले जाईल.