इंटरनेटच्या (Internet) युगात आजही भारतात मोठ्या प्रमाणावर अरेंज्ड मॅरेज (arrears marriage) होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कुटुंबातील सदस्य त्यांच्या मुलांसाठी चांगली वधू (bride) किंवा वर (groom) मिळावा यासाठी विविध प्रयत्न करत असतात. यामध्ये नातेवाईकही मागे राहत नाहीत. लग्न जुळवणाऱ्या संस्थापासून (marriage bureau) ते विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर (whatsapp group) मुलांचे बायोडाटा (biodata) फॉरवर्ड करत सुटतात. याशिवाय काही लोक वृत्तपत्रातही याबाबत जाहिरातीही (newspaper ad) देतात. अशीच एक लग्नाची जाहिरात (ad for marriage) सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या वैवाहिक जाहिरातीतील विचित्र गोष्ट अशी आहे की कुटुंब वराच्या शोधात आहे. हे कुटुंब डॉक्टर, IAS, IPS किंवा व्यावसायिक असलेल्या वराचा शोध घेतय. पण त्यांना सॉफ्टवेअर इंजिनियर (Software engineer) तरुण मात्र नकोय. जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर (Software engineer) असाल तर फोन करू नका असा इशाराच जाहिरातीमधून मुलीच्या कुटुंबियांनी दिलाय.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेली ही जाहिरात उद्योगपती समीर अरोरा यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एका वृत्तपत्रात विवाहाची जाहिरात दिसत आहे. “समृद्ध 24 वर्षांच्या कुटुंबातील सुंदर मुलीसाठी वर शोधत आहे. कुटुंबाला एकाच जातीचा IAS/IPS किंवा डॉक्टर (PG) किंवा उद्योगपती/व्यावसायिक असा वर हवा आहे. जाहिरातीच्या शेवटी "सॉफ्टवेअर इंजिनियर कृपया कॉल करू नका" असे म्हटले आहे.
Future of IT does not look so sound. pic.twitter.com/YwCsiMbGq2
— Samir Arora (@Iamsamirarora) September 16, 2022
जाहिरात पोस्ट करताना समीर अरोरा यांनी कॅप्शनमध्ये म्हंटलय की, "IT चे भविष्य इतके चांगले दिसत नाही." यावर एका यूजरने आपण इतके वाईट आहोत का? असा प्रश्न उपस्थित केलाय. तर दुसऱ्या एका युजरने काही हरकत नाही इंजिनियर काही वृत्तपत्रांच्या वैवाहिक जाहिरातींवर विश्वास ठेवत नाही. ते स्वतःच शोधण्यात सक्षम आहेत, असं म्हटलं आहे.