Railway Accident : भीषण! लांब पल्ल्याच्या 'या' रेल्वेगाडीचे 11 डबे रुळावरून घसरले

Railway Accident : प्रशासनाकडून तातडीनं हेल्पलाईन क्रमांक जारी. पाहा तुमच्या ओळखीतलं कुणी या रेल्वेनं प्रवास तर करत नव्हतं... 

Updated: Jan 2, 2023, 12:09 PM IST
Railway Accident : भीषण! लांब पल्ल्याच्या 'या' रेल्वेगाडीचे 11 डबे रुळावरून घसरले  title=
railway accident Jodhpur Suryanagari Express train 11 coaches derailed

Railway Accident : आठवड्याच्या सुरुवातीलाच हादरवणारी बातमी समोर आली आहे. राजस्थान येथील (Rajasthan) पाली भागात बांद्रा-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस (Bandra Terminus-Jodhpur Suryanagari Express) या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीचे 11 डब्बे सोमवारी पहाटे रुळावरून घसरले. पहाटे साधारण 3.27 वाजता हा अपघात झाला अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. 

सीपीआरओने दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, उत्तर पश्चिम रेल्वेविभागाकडून उच्च अधिकारी सध्या या प्रकरणावर लक्ष केंद्रीत करत आहेत. तर, घटनेची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकारी लवकरच घटनास्थळी पोहोचले आहेत.  

सदर अपघातानंतर रेल्वेकडून लगेचच प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले.

जोधपूरसाठीचे दूरध्वनी क्रमांक- 02912654979, 02912654993, 02912624125, 02912431646

पाली, मारवाडसाठीचे दूरध्वनी क्रमांक- 02932250324

प्रवासी आणि त्यांचे कुटुंबीय पुढील क्रमांकांवरही संपर्क साधू शकतात - 138 आणि 1072

हेसुद्धा वाचा : Delhi Crime News: दिल्लीत घडली क्रूर घटना; तरुणीला 13 KM फरफटत नेलं आणि... विवस्त्र मृतदेह पाहून पोलिस हादरले

 

कसलातरी आवाज आला आणि... 

प्रत्यक्षदर्शींनी सदर अपघातावेळी नेमकी काय परिस्थिती होती, याची माहिती माध्यमांशी संवाद साधताना दिली. 'अवघ्या 5 मिनिटांमध्ये मारवाड स्थानकातून निघाल्यानंतर ट्रेनमध्ये कसलीतरी कंपनं जाणवून आवाज झाला. पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या मिनिटालाच ट्रेन थांबली. आम्ही उतरून पाहिलं, तर रेल्वेचे किमान 8 स्लीपर कोच रुळावरून घसरले होते. 10- 15 मिनिटांमध्ये एकच गोंधळ झाला. Ambulance तेथे आल्या'.