Weather Update : पर्यटनासाठी जानेवारी उत्तम; देशातील 'या' भागात तापमान उणे 2 अंशांहूनही कमी

weather update New year : यंदाच्या वर्षी (Rain Updates) पावसाचा मुक्काम चांगला वाढला होता. त्यामुळं थंडीसुद्धा चांगलीच मुक्कामी असेल असाच अनेकांचा समज होता. पण, तसं काहीच झालं नाही. 

Updated: Jan 2, 2023, 07:07 AM IST
Weather Update : पर्यटनासाठी जानेवारी उत्तम; देशातील 'या' भागात तापमान उणे 2 अंशांहूनही कमी  title=
weather update january 2023 likely to be cold says climate department imd

weather update New year : यंदाच्या वर्षी (Rain Updates) पावसाचा मुक्काम चांगला वाढला होता. त्यामुळं थंडीसुद्धा चांगलीच मुक्कामी असेल असाच अनेकांचा समज होता. पण, तसं काहीच झालं नाही. उलटपक्षी डिसेंबर महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं नव्या वर्षातही थंडी दगा देणार का, असाच अनेकांचा समज झाला. पण, तसं नाहीये. कारण, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याने वर्षाचा पहिलाच दिवस गारेगार केला. इतकंच नव्हे तर येणाऱ्या महिन्याभरातही थंडीचा कडाका जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. (January cold wave) 

रविवारी म्हणजेच 2023 या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईचे (Mumbai temprature) किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली. जाणून आश्चर्य वाटेल पण, मुंबई आणि माथेरान या दोन शहरांचे किमान तापमान १५ अंशांवर असल्याने मुंबईकरांना खऱ्या अर्थानं New Year ला थंडीमुळं माथेरानमध्येच (Matheran) असल्याची अनुभूती मिळाली. (weather update january 2023 likely to be cold says climate department imd)

हेसुद्धा वाचा : HappyNewYear2023 : नवीन वर्षात तुमच्या 'या' सुट्या जाणार वाया...एकदा पाहून घ्या !

 

दरम्यान, जानेवारी महिना हा कडाक्याच्या थंडीचा असेल असाच अंदाज हवामान खात्यानंही वर्तवला आहे.सध्यच्या घडीला राज्यभरातील बहुतांश शहरांचे किमान तापमान 11 ते 12 अंशापर्यंत नोंदवण्यात आले आहे. 

पर्यटनासाठी हा काळ उत्तम (tourism in janaary)

हिमालय पर्वरांगांतच्या भागामध्ये सातत्यानं तापमान होणारी घट आणि होणारा हिमवर्षाव (Snowfall) पाहता सबंध देशभरात याचे परिणाम दिसून येत आहेत. लडाख (Ladakh), काश्मीर (Kashmir), हिमाचल प्रदेश (Himachal pradesh), स्पितीचं खोरं (Spiti valley) या भागांमध्ये प्रचंड थंडी पडली असून, काही भागांमध्ये जलस्त्रोतही गोठल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला या थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं गिरीस्थानांकडे वळताना दिसत आहेत. अगदी महाराष्ट्रातलं महाबळेश्वर (Mahabaleshwar), राजस्थानातील माऊंट अबू (Mount abu), केरळातील मुन्नार (Munnar) आणि हिमाचलमधील बहुतांश भागांमध्ये पर्यटकांची गर्दी आहे. सध्याचं वातावरण पाहता सुट्ट्यांची जुळवाजुळवही शक्य असल्यामुळं हा काळ पर्यटनासाठी उत्तम ठरत आहे. 

उत्तराखंडमध्ये तापमान उणे 4 अंशांवर  

हिमाचल आणि काश्मीरमध्ये तापमान 0 अंशांच्याही खाली गेलेलं असतानाच उत्तराखंडमध्येही (Uttarakhand) अशीच काहीशी परिस्थिती आहे. इथं चमोली जनपद, बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहिब, रुद्रनाथ या आणि अशा अशा इतरही भागांमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. बद्रीनाथ (Badrinath), औली (Auli), जोशीमठ इथं तापमान अनुक्रमे उणे 4, 2, 2 इतक्या अंशांवर उतरलं आहे.