Indian Railway Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी (Railway Employees) एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Government) रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway Employees) 78 दिवसांच्या पगाराइतका दिवाळी बोनस (Diwali Bonus) जाहीर केला. मात्र, आरपीएफ आणि आरपीएसएफच्या जवानांना हा लाभ मिळणार नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा 11.27 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून (railway ministery) सांगण्यात आले की, लॉकडाऊनच्या (Lockdown) काळातही रेल्वे कर्मचाऱ्यांनी अन्न, खत, कोळसा आणि इतर वस्तूंची अखंडित वाहतूक केली. गेल्या तीन वर्षांत मालवाहतुकीत बाजारपेठेतील वाटा मिळवण्यासाठी आणि योग्य धोरणात्मक उपक्रमांद्वारे प्रवासी भाडे वसूल करण्यासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत.
वाचा : IND vs SA: दुसऱ्या T20 सामन्यात 'या' खेळाडूचा पत्ता होणार कट
हा बोनस रेल्वेच्या नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. अधिकारी पदावर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना नॉन गॅझेटेड कर्मचारी म्हटलं जातं. क्लास वन, क्लास टू स्तरावरील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना गॅझेटेड कर्मचारी म्हटलं जातं. दरवर्षी हा बोनस दसरा आणि दुर्गापुजेच्या कालावधीमध्येच जाहीर केला जातो. महिन्याला सात हजार रुपये पगार असणारे नॉन गॅझेटेड कर्मचारी या बोनससाठी पात्र असणार आहेत. 78 दिवसांचा बोनस म्हणून जास्तीत जास्त 17 हजार 951 रुपये दिले जाणार असल्याचं पात्रतेच्या निकषांबद्दल स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान रेल्वे कर्मचार्यांना 78 दिवसांच्या बोनससाठी 1,832.09 कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे. बोनस भरण्यासाठी विहित वेतन गणना मर्यादा रु 7,000 प्रति महिना आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांसाठी जास्तीत जास्त 17,951 रुपये दिले जातील.