Gandhi Jayanti 2022: आज 2 ऑक्टोबर 2022. आज महात्मा गांधी यांची 153 जयंती आहे. आज गांधी जयंती जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे (ahinsa) तत्वज्ञान शिकवणा महात्म्याचा आज जन्मदिवस (birthday) ... जगभरात आजचा दिवस अहिंसा दिन (ahinsa din) म्हणून साजरा केला जातो.एक स्वातंत्र सैनिक (freedom fighter) आणि थोर विचारवंत म्हणून प्रत्येक भारतियाच्या मनात बापूजींबद्दल आदराचं स्थान आहे.
महात्मा गांधी यांचा एक फोटो प्रमाणात व्हायरल (viral) होत होता ज्यात त्यांनी धोतर नेसलंय आणि एक फॉरेनर तरुणीसोबत नाचताना दिसत आहेत. या एका फोटोमुळे खूप गोंधळ झाला होता लोकांकडून ना ना तर्हेच्या कंमेंट्स येऊ लागल्या होत्या. (Fact Check mahatma gandhi viral danching with girl photo viral on social media )
सोशल नेटवर्किंग साइट्सवर (social media) लोक हा फोटो खूप प्रमाणात शेअर करत होते. जे गांधीजींना मानणारे आहेत त्यांनी या फोटोवर सडकून विरोध केला तर तर जे गांधीजींच्या विरोधात आहेत त्यांनी याची खूप मजा घेतली.
पण सत्य वेगळं आहे, बॉलीवूड पीआर डेल भगवगर यांनी हि गोष्ट निदर्शनास आणून दिली कि जर हे चित्र तुम्ही बारकाईने झूम करून पाहाल तर तुम्हाला खरा फरक जाणवेल, डेल यांच्यानुसार ''जर बारकाईने पाहिलं तर आपण पाहू शकतो कि या फोटोमधील व्यक्तीचे हात बळकट
दिसत आहेत पण महत्मा गांधी यांची कायाकुडी आपण सारेच जाणतो ते अतिशय हडकुळे होते'' पुढे ते म्हणतात ''इतिहास अश्या चुकीच्या पद्धतीने समोर आणण हे खूप धोकादायक आहे अशा प्रकारे फोटो मॉर्फ कारण आणि लोकांची दिशाभूल करणं हे अत्यंत चुकीची आहे '' वर
दिसलेला फोटो (photo) खरा आहे पण त्यातले गांधी खोटे आहेत वरवर पाहता हा एक ऑस्ट्रेलियन अभिनेता आहे जो गांधीच्या रूपात उभा आहे जो महिलेसोबत डान्स करत आहे '. सिडनीतील एका चॅरिटी गालामध्ये (charity) दोघांना पकडण्यात आले, असं अनेक वृत्तांनुसार समोर आलं आहे.
येणाऱ्या पिढीपर्यंत आपण अशा प्रकारे चुकीचा इतिहास पोहचवतो आणि ते कधीच योग्य नाही. त्यामुळे हे स्पष्ट झालं कि हा फोटो महात्मा गांधी यांचा नसून मॉर्फ केलेला आहे. इंटरनेटवरील अशी छायाचित्रे आपल्या महान राष्ट्रीय नेत्यांचा अपमान आहे. (Fact Check mahatma gandhi viral danching with girl photo viral on social media jmp)