'राहुल यांच्या यशात भाजपाच्या निष्क्रियतेचा हात'

राहुल यांच्या यशात भाजपाच्या निष्क्रियतेचा हात असल्याचे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 18, 2017, 10:09 AM IST
  'राहुल यांच्या यशात भाजपाच्या निष्क्रियतेचा हात' title=

मुंबई :  राहुल यांच्या यशात भाजपाच्या निष्क्रियतेचा हात असल्याचे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

 जसे राहुल गांधी यांच्यामूळे मोदी पंतप्रधान झाले होते. त्याप्रमाणे भाजपाच्या आश्वासनांच्या फुगवट्यामूळे भाजपाला धक्का मिळत असल्याचे राऊत म्हणाले.

कॉंग्रेसने मिळवलेले यश हे कौतूकास्पद असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले. गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील वातावरण यापेक्षा बिघडले असल्याचे त्यांनी सांगितले. 

 
 दरम्यान,  गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला (89 विधानसभा जागा) तर, 14 डिसेंबरला (93 विधानसभा जागा ) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका पार पडल्या. या मतदानाची एकूण मतमोजणी आज (सोमवार) पार पडत आहे. गुजरात निवडणुकीसाठी 50,128 पोलिंग बूथ बनविण्यात आले होते. गोवा नंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्ये अशी आहेत. ज्यात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला गेला.