नवी दिल्ली : गुजरातमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजनी मध्ये क्षणाक्षणाला बदल होताना दिसत आहे. काही वेळापूर्वीच भाजपला मागे टाकून काँग्रेसने आघाडी घेतली. मात्र, पुन्हा एकदा काँग्रेसवर कडी करत भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस बॅकफुटला तर, भाजप फ्रंटला अशी स्थिती पहायला मिळत आहे.
ताज्या वृत्तानुसार भाजप सध्या 99 जागांवर आघाडीवर आहे. तर, काँग्रेस 80 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी प्रचंड पिछाडीवर आहेत. जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर हेही जोरदार आघाडीवर आहेत. त्यामुळे गुजरातमधले राजकीय चित्र प्रचंड बदलताना दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला किंवा अल्पमतात सत्ता आली तरी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी तो प्रचंड मोठा धक्का असणार आहे. दरम्यान, निवडणुकीचे कल क्षणाक्षणाला बदलत आहेत अद्याप कोणतेही चित्र स्पष्ट झाले नाही.
देशाचे राजकारण वेगळ्या टप्प्यावर पोहोचेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपची एकहाती सत्ता
दरम्यान, गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला (89 विधानसभा जागा) तर, 14 डिसेंबरला (93 विधानसभा जागा ) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका पार पडल्या. या मतदानाची एकूण मतमोजणी आज (सोमवार) पार पडत आहे. गुजरात निवडणुकीसाठी 50,128 पोलिंग बूथ बनविण्यात आले होते. गोवा नंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्ये अशी आहेत. ज्यात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला गेला.