नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत (,Delhi) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तिसऱ्या आघाडीची चाचपणी करण्यात येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलिकडेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतल्याचे पुढे आले. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीची चर्चा होती. मात्र, त्यांची भेट काही होऊ शकलेली नाही. अशातच आता शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनीच या भेटीबाबत माहिती दिली. राहुल गांधी यांच्यासोबत बैठक झाली. राहुल गांधी यांच्यासोबत आमची एक भेट राहिली होती, त्यांच्या मनात काही शंका होत्या त्या दूर झाल्या आहेत. त्यांनी, मी लवकरच महाराष्ट्रात येईन, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.
आमची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जाणून घेण्यात काही उत्सुकता होती. त्याबाबतही त्यांनी काही गोष्टी जाणून घेतल्या. जे शिवसेनेने केले ते योग्य केले. त्याचा मालकी हक्क कुणाकडे नाही.2024 मध्ये युतीच्या प्रश्नांवर जी काही चर्चा झाली आहे त्याची माहिती मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगेन, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.
आज सुद्धा सर्व विरोधी पक्षसाठी राहुल गांधी यांनी ब्रेक फास्ट ठेवला आहे तिथे आमही जाणार आहोत. अनेक मुद्यावर आम्ही एकत्र काम करत आहोत, असे सांगताना केंद्र सरकारवर आरोप केला. सरकार संसद चालूं देत नाही. त्याचा फटका आम्हला आहे. महाराष्ट्राच्या राजकारण विषयी काही नवीन माहीती मी दिली आहे. विरोधी पक्ष आता कमालीचा एकजूट आहे, असे राऊत म्हणाले.
I'm grateful to Nitish Kumar. He has always been an ideal leader. Today he's with the govt but his soul is with us, I know. If he's saying that 'Pegasus' issue must be probed, then he has spoken what Opposition is saying. Modi ji should listen at least now: Sanjay Raut, Shiv Sena pic.twitter.com/K0Sd5WnlZc
— ANI (@ANI) August 3, 2021
नितीश कुमार यांनीही आमच्या सुरात सूर मिसळून Pegasusच्या चौकशी ची मागणी केली. सरकार अगदी फुलपाखरु सारखे उडत आहे. ते भक्कम आहे. कोणत्याही ओझ्याने हे सरकार पडणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, कोरोना निर्बंधावर ते म्हणाले, पुण्यातील पालकमंत्री बोलतील. मुंबईतही अनेक निर्बंध आहे.