बर्कले : राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. इंडिया अॅट ७० रिफ्लेक्शन्स ऑन द पाथ फॉरवर्ड या विषयावर राहुल गांधी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, बर्कलेमध्ये राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राहुल गांधींनी मोदींचं कौतुक केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझेही पंतप्रधान आहेत. मोदी माझ्यापेक्षा चांगले वक्ते आहेत. नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्याची कला त्यांच्यामध्ये आहे, असं राहुल गांधी म्हणाले. तसंच स्वच्छ भारत अभियान ही मोदींची संकल्पना मला आवडली, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली. यावेळी बोलताना राहुल गांधींनी मोदींवर निशाणाही साधला. नोटबंदीमुळे देशाचं नुकसान झालं आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि GDP पडला आहे. नोटबंदी करताना संसदेला अंधारात ठेवण्यात आल्याचं राहुल गांधी म्हणाले.
हिंसाचारानं कोणाचंही भलं झालेलं नाही. हिंसेमुळे मी माझी आजी आणि वडिल गमावले आहेत. माझ्यापेक्षा जास्त हिंसा कोणाला कळेल. ज्या लोकांनी माझ्या आजीला गोळ्या घातल्या, त्यांच्याबरोबर मी बॅडमिंटन खेळायचो. मला माहिती आहे हिंसेमुळे काय नुकसान होऊ शकतं, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे.