'मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, भाजपला जोरदार झटका'

गुजरात निकालामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच भाजपला जोरदार झटका बसला आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात निकालानंतर प्रथमच केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 19, 2017, 02:43 PM IST
'मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, भाजपला जोरदार झटका'  title=

नवी दिल्ली : गुजरात निकालामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच भाजपला जोरदार झटका बसला आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात निकालानंतर प्रथमच केली आहे.

 मोदींचे विकास मॉडेल खोटे

 गुजरातमध्ये भाजपला ९९ तर काँग्रेसला ८० जागा मिळाला आहेत. भाजपचा विजय झाला तरी भाजपला मोठा झटका बसला आहे, आमचा पराभव झाला तरी निकाल चांगला चागला आहे असे सांगत राहुल गांधी यांनी मोदींचे विकास मॉडेल खोटे असल्याची टीका केली आहे.

भ्रष्टाचारावर मोदी गप्प का?

मोदी आधी भ्रष्टाचारावर बोलत होते. आता ते भ्रष्टाचारावर बोलत नाही. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलाच्या भ्रष्टाचाराबाबत ते बोलत नाही. जीएसटी तसेच विकासाबाबत मोदी या निवडणुकीत काहीही बोलले नाही, त्यांचा विकासाचा दिखावा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.