काँग्रेस हा दुर्बल मुस्लिमांचा पक्ष - राहुल गांधी

'दैनिक इंकलाब'नं यासंदर्भातलं वृत्त प्रकाशित केलंय 

Updated: Jul 13, 2018, 10:59 AM IST
काँग्रेस हा दुर्बल मुस्लिमांचा पक्ष - राहुल गांधी title=

नवी दिल्ली : काँग्रेस हा मुस्लीमांचा पक्ष असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलंय. मुस्लीम धर्मीय देशातील दुर्बल घटक आहेत आणि काँग्रेस दुर्बलांचा पक्ष असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. मुस्लीम नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राहुल गांधींनी हे विधान केलंय. 'दैनिक इंकलाब'नं यासंदर्भातलं वृत्त प्रकाशित केलंय. 

दरम्यान, देशातील सर्व बडे काँग्रस नेते आज राहुल गाधींची भेट घेणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुच्या मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होणार आहे. दिल्ली काँग्रेस मुख्यालयात ही भेट होणार आहे. कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान राहुल गांधी पक्ष मजबूत आणि आगामी निवडणुकांच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचं समजतंय.