सचिन पायलट यांच्या जागी रघुवीर मीणा यांना मिळू शकते प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी

सचिन पायलट यांच्या बंडखोरीचा रघुवीर मीणा यांना होऊ शकतो फायदा... 

Updated: Jul 15, 2020, 09:45 AM IST
सचिन पायलट यांच्या जागी रघुवीर मीणा यांना मिळू शकते प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी title=

जयपूर : मध्यप्रदेश नंतर राजस्थान काँग्रेसमध्ये ही राजकीय पेचप्रसंगाचे वातावरण आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधियाच्या बंडखोरीने कमलनाथ सरकार पडले. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे अशोक गहलोत यांचं सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गहलोत देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. आज गहलोत हे सचिन पायलट यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करु शकतात. सचिन पायलट यांच्या जागी रघुवीर मीना यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोण आहेत रघुवीर मीणा?

रघुवीर मीणा हे राजस्थानच्या राजकारणातील मोठे नेते असून सरपंच, विधानसभा आणि त्यानंतर ते लोकसभेत पोहोचले. 1988 मध्ये रघुवीर मीना उदयपूर जिल्ह्यातील सारडा तहसील अंतर्गत ग्रामपंचायत खारबरचे सरपंच झाले. 61 वर्षांचे रघुवीर मीणा यांनी 1993 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीनंतर प्रथमच सारदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. 2008 पर्यंत ते या जागेवरुन निवडणुका जिंकत राहिले आणि अशोक गहलोत सरकारमध्ये मंत्रीही बनले.

अशोक गहलोत यांचे जुने सहकारी आणि निकटवर्ती सहकारी अशी ओळख असलेले रघुवीर मीना यांना संघटनेत मोठा अनुभव आहे. युवा काँग्रेसपासून राज्य काँग्रेस कमिटीपर्यंत रघुवीर मीणा यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 2005 ते 2011 पर्यंत ते राजस्थान काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि प्रदेश उपाध्यक्ष देखील होते. शारदा विधानसभेनंतर रघुवीर मीणा यांनी 2008 मध्ये सलूंबर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उदयपूर मतदारसंघातून तिकीट दिले. तेथे ही त्यांनी विजय मिळवला.

अशाप्रकारे रघुवीर मीना यांना ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा, युवा काँग्रेस, प्रदेश काँग्रेस या अनुभवांसह काँग्रेस कार्यकारिणी सदस्य म्हणून संधी देण्यात आली. ते चार वेळा आमदार होते, मंत्री होते आणि उदयपूरचे खासदारही होते. सचिन पायलट यांच्या बंडखोरीचा फायदा रघुवीर मीना यांना होऊ शकतो आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना मिळू शकते. अशी चर्चा आहे.

गोविंदसिंग डोटासरा यांच नाव ही चर्चेत

गोविंदसिंग डोटासरा यांचं नाव देखील प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आहे. गोविंदसिंग डोटासरा हे सध्या राजस्थानचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत. ते राजस्थान सरकारमध्ये पर्यटन आणि देवस्थान मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळतात.

गोविंदसिंग डोटासरा हे 1981 पासून काँग्रेसमध्ये आहेत. 2008 पासून ते राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.