नोटाबंदी निर्णयाच्या संभाव्य धोक्यांबाबत बजावले होते - राजन

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पहिल्यांदात नोटाबंदीनंतर, नोटाबंदीविषयी वक्तव्य केलं आहे.रघुराम राजन यांनी या निर्णयावर टीका करताना  नोटाबंदीच्या संभाव्य धोक्यांबाबत सरकाला आधीच बजावले होते असे सांगितले आहे. 

Updated: Sep 3, 2017, 08:31 PM IST
नोटाबंदी निर्णयाच्या संभाव्य धोक्यांबाबत बजावले होते - राजन title=

नवी दिल्ली : आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पहिल्यांदात नोटाबंदीनंतर, नोटाबंदीविषयी वक्तव्य केलं आहे.रघुराम राजन यांनी या निर्णयावर टीका करताना  नोटाबंदीच्या संभाव्य धोक्यांबाबत सरकाला आधीच बजावले होते असे सांगितले आहे. 

 नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या सुमारे ९९ टक्के नोटा चलनात परत आल्याचे समोर आल्यानंतर नोटाबंदीच्या फसलेल्या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. 

 रघुराम राजन यांनी आपल्या पुढील आठवड्यात प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात या संदर्भातील आपले मत मांडले आहे. त्यात ते म्हणतात, मी नोटाबंदीच्या दीर्घकालीन फायद्यांवर पुढील काळातील नुकसान भारी पडण्याची शक्यता असल्याचा इशारा सरकारला दिला होता.'काळा पैसा व्यवस्थेत आणण्यासाठी सरकारला अन्य उपाय सूचवले होते', असेही त्यांनी सांगितले.  

 सरकारला फेब्रुवारी २०१६ मध्ये आपण तोंडी सल्ला दिला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने सरकारला एक टाचण दिले होते, ज्याता यासंदर्भात उचलण्यात येणारी आवश्यक पावले आणि त्याचा कार्यकाळ या संदर्भातील माहिती दिली होती. तसेच नोटाबंदी संदर्भात रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधण्यात आला होता. पण आपल्या कार्यकाळात नोटाबंदीचा निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला नव्हता, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाले आहे.