खोटं प्रतिज्ञापत्र देणाऱ्या मोदी सरकारला बरखास्त करा - काँग्रेसची मागणी

सर्व यंत्रणा या रबर स्टँप झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय

Updated: Jan 4, 2019, 12:20 PM IST
खोटं प्रतिज्ञापत्र देणाऱ्या मोदी सरकारला बरखास्त करा - काँग्रेसची मागणी  title=

नवी दिल्ली : राफेल गैरव्यवहार प्रकरणी 'सर्वोच्च न्यायालयात चुकीचं प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या सरकारला बरखास्त करा', अशी टीका आज काँग्रेसने केलीय. राफेल हा जगातला सर्वात मोठा गैरव्यवहार असून त्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. या गैरव्यवहाराचा तपासही कोणत्याही संस्थेला यशस्वीरित्या करता येणार नाही, कारण सर्व यंत्रणा या रबर स्टँप झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.

काय आहे राफेल घोटाळा?

काँग्रेस राफेल डीलमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत आहे तर मोदी सरकार मात्र काँग्रेसचे सगळे आरोप फेटाळून लावत आहे. या मुद्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं आधीच फेटाळल्यात. आता प्रशांत भूषण आणि अरुण शौरी यांनी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केलीय. 

राहुल गांधी राफेलची डील १ लाख ३० हजार करोडची डील असल्याचं सांगत आहेत. तर अरुण जेटली यांनी मात्र हा एकूण व्यवहार ५८ हजार करोडचा असल्याचं सांगितलंय. यावर, 'सरकारनं अगोदर गोपनीय सांगून आता जेटली यांनी आता का ५८ हजार करोड रुपयांची डील असल्याचं म्हटलंय?' असा प्रश्न राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत विचारला होता. '५०० करोड रुपयांची विमानं मोदी सरकार १६०० करोडमध्ये का खरेदी करत आहे?' असाही सवाल राहुल गांधींनी विचारलाय.